married woman assaulted : दिल्लीत २० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; तोंडाला काळ फासत पीडितेचा गर्दीत विनयभंग, धिंडही काढली

राजधानी दिल्लीतील (Capital Delhi) कस्तुरबा नगरमध्ये (Kasturba Nagar)महिलेसोबत भयंकर वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका २० वर्षीय विवाहित महिलेला (married woman) पकडून गर्दीत तिचा विनयभंगही करण्यात आला. या महिलेवर सामूहिक बलात्कार (gang rape) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

delhi 20 years old married woman sexually assaulted
२० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार,पीडितेची धिंडही काढली  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • बहिणीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली.
  • पूर्ववैमनस्यातून महिलेसोबत हे वर्तन करण्यात आले.
  • दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस बजावली आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Capital Delhi) कस्तुरबा नगरमध्ये (Kasturba Nagar)महिलेसोबत भयंकर वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका २० वर्षीय विवाहित महिलेला (married woman) पकडून गर्दीत तिचा विनयभंगही करण्यात आला. या महिलेवर सामूहिक बलात्कार (gang rape) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेचं मुंडन देखील करण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पूर्व वैमनस्यातून तोंडाला काळ फासून आणि गर्दीत विनयभंग करत महिलेची धिंड काढण्यात आली आहे. 

महिलेच्या लहान बहिणीने पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला वाचवले. तिचे समुपदेशन केले जात आहे. बहिणीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली चार महिलांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून महिलेसोबत हे वर्तन केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला विवाहित आहे. तिला एक मूलही आहे. शेजारी राहणारा एक मुलगा आपल्या बहिणीच्या मागे पडला होता. नंतर त्या मुलाने १२ नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. आपल्या बहिणीमुळेच मुलाने आत्महत्या केल्याचे मुलाच्या कुटुंबीयांना वाटते आहे, असे पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे. मुलाच्या आत्महत्येनंतर ही महिला भाड्याने राहत होती.
या रागातून तेथील नागरिकांना महिलेचे तोंड काळे करत, गळ्यात चपलांचा हार घालून रस्त्यावर धिंड काढण्यात आली.  

या प्रकरणामुळे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल संतापल्या आहेत. त्यांनी पीडितेची भेट घेऊन तिच्याशी बोलून या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली.  'कस्तुरबा नगरमध्ये अवैध दारू विक्रेत्यांनी २० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला, तिचे मुंडन केले, चपलांचा हार घालून, तोंडाला काळेपासून तिची धिंड काढली. दिल्ली पोलिसांना नोटीस बजावत आहे. सर्व गुन्हेगार स्त्री-पुरुषांना अटक करून पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी, असे मालीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी