'अब की बार, केजरीवाल सरकार'; दिल्ली विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव, भाजपला धक्का!

arvind kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 58 मते पडली आहेत. उपसभापतीसाठी 1 मत वेगळे, म्हणजेच त्यांना एकूण 59 मते मिळाली.

Delhi Assembly: Kejriwal government wins trust vote, 59 in favor and 0 in opposition
'अब की बार, केजरीवाल सरकार'; दिल्ली विधानसभेत जिंकला विश्वासदर्शक ठराव   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केजरीवाल यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला,
  • आपच्या बाजूने ५८ मते पडली
  • केजरीवाल यांची भाजपवर टिका

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 58 मते पडली आहेत. उपसभापतीसाठी 1 मत वेगळे, म्हणजेच एकूण 59 मते मिळाली. विरोधकांच्या बाजूने शून्य मते पडली. यानंतर विधानसभेचे कामकाज अखेरपर्यंत तहकूब करण्यात आले. (Delhi Assembly: Kejriwal government wins trust vote, 59 in favor and 0 in opposition)

अधिक वाचा : Delhi Crime : झारखंच्या घटनेची दिल्लीत पुनरावृत्ती; चॅटिंग करणे बंद केले म्हणून अल्पवयीन मुलीला घातली गोळी

दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी गुरुवारी सभागृहात गदारोळ सुरू झाला. त्यामुळे दिल्लीच्या उपसभापती राखी बिर्ला यांनी भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांच्यासह चार आमदारांची दिवसभरासाठी सभागृहातून हकालपट्टी केली. विरोधी पक्षनेते रामवीर सिंग बिधुरी आणि भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांनी लक्षवेधी प्रस्तावावरही चर्चा व्हावी, अशी मागणी केली.

दुसरीकडे, विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान इतर मुद्द्यांवर चर्चा होऊ शकत नाही, असा युक्तिवाद उपसभापतींनी केला. विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, अरविंद केजरीवाल सरकारला 62 आमदारांचा पूर्ण पाठिंबा आहे, मग या नाटकाची गरज काय?

दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. सत्ताधारी आपचे ६२ तर भाजपचे ८ आमदार आहेत. AAP कडे दोन तृतीयांश पेक्षा जास्त बहुमत असूनही केजरीवाल यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी