Weather Update Today | नवी दिल्ली : मागील काही आठवड्यांपासून देशातील मोठ्या भागात उष्णतेच्या लाटा आणि उष्णतेने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. कडक उन्हामुळे घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे दुपारी रस्त्यावरून चालताना गरम वाफांचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवर भयान शांतता असल्याचे चित्र आहे. देशाची राजधानी दिल्लीतील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. (Delhi breaks 72-year heat record, central government gives guidelines).
अधिक वाचा : आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण, वाचा सविस्तर
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे सरासरी महिन्याचे कमाल तापमान ४०.२ अंश सेल्सिअस होते. एप्रिल महिन्यात देशाच्या राजधानीत ७२ वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान नोंदवले गेले. २८ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी दिल्लीत ४३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. यापूर्वी २९ एप्रिल १९४१ रोजी दिल्लीत ४५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान उष्माघातापासून वाचण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही सूचना दिल्या आहेत.
उष्माघातावेळी काय करावे आणि काय करू नये याची संपूर्ण आरोग्य मंत्रालयाने एक यादी जारी केली आहे. घरामध्ये आणि सावलीच्या ठिकाणी राहणे. घराबाहेर जाताना टोपी/टॉवेल किंवा छत्रीचा वापर करा. पातळ सैल सुती आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. पाणी, लस्सी, लिंबूपाणी अशी थंड पेय घ्या. टरबूज, काकडी, संत्री यांसारखी थंडगार फळे खा. घरातील तापमान कमी ठेवा, खिडकीचे पडदे, कूलर-एसी यांचा प्रामुख्याने वापर करा.
वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि महिलांना अस्वस्थ वाटत असल्यास सर्वप्रथम त्यांना थंड ठिकाणी नेणे, सुती कपडे घालणे, थंड पाण्याने स्पंज लावणे आणि त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रात नेणे.
उन्हात बाहेर पडू नका, खासकरून दुपारी ३ वाजेपर्यंत या वेळेत. दुपारच्या वेळी बाहेर पडताना जास्त कष्टाचे काम करणे टाळा. दारू, चहा, कॉफी इत्यादींचे सेवन करू नका. पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका. डार्क रंगाचे घट्ट सिंथेटिक कपडे घालू नका.
दिल्लीशिवाय देशाच्या अनेक भागांमध्ये कडाक्याची उष्णता जाणवत आहे. दिल्लीतील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच हवामान खात्याने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे.