दारुच्या नशेत रात्रभर पत्नीसोबत झोपला, सकाळी पाहिलं तर काय पायखालची वाळूच सरकली

Delhi crime : दिल्लीतील फतेहपूर बेरी भागात पती-पत्नीमध्ये भांडण झाले. पतीने दारूच्या नशेत बायकोचे तोंड उशीने दाबले. त्यानंतर तो रात्रभर बाॅडीसोबत झोपला.

Delhi: Forgot after killing, then husband slept with wife's body all night
दारुच्या नशेत रात्रभर पत्नीसोबत झोपला, सकाळी पाहिलं तर काय पायखालची वाळूच सरकली ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दारुच्या नशेत पती-पत्नीची भांडणे
  • रागाच्या भरात पत्नीचे तोंड उशीने दाबले
  • तरीही तो रात्रभर तिच्यासोबत झोपला

दिल्ली : दिल्लीतील फतेहपूर बेरीमध्ये पती-पत्नीसोबत दारु प्यायला. त्यानंतर जेवण वाढत असताना दोघांमध्ये भांडण झाले. भांडण इतके वाढले की पतीने उशीने पत्नीचे तोंड दाबले. गुदमरून पत्नीचा मृत्यू झाला. मात्र पतीने याकडे दुर्लक्ष केल्याने तो रात्रभर मृतदेहासोबत झोपला. सकाळी उठल्यावर जे पाहिलं त्याने पतीच्या पायाखालची जमीन सरकली.(Delhi: Forgot after killing, then husband slept with wife's body all night)

अधिक वाचा: 

China detects Aliens : परग्रहवासियांचे सिग्नल सापडल्याचा चीनचा आधी दावा, मग हटवले वृत्त...काय लपवतोय चीन?

हे प्रकरण आहे राष्ट्रीय राजधानीतील सुलतानपूर भागातील. येथे 39 वर्षीय सोनाली पती विनोदसोबत राहत होती. दोघांनी २००८ साली लग्न केले होते. कोरोनामुळे लॉकडाऊननंतर विनोद कुमार यांची नोकरी गेली होती. तेव्हापासून तो बेरोजगार होता. विनोद घरीच असायचा. यादरम्यान त्याला दारूचे व्यसन लागले.

अधिक वाचा: 

पावागडच्या मंदिरात पीएम मोदींच्या उपस्थितीत पूजा, शेकडो वर्षांनी बांधला कळस केले ध्वजारोहण

गुरुवारी रात्री विनोद दारू घेऊन आला होता. पती-पत्नीने एकत्र दारू प्यायली.तर पत्नी सोनालीने जेवण केले. त्याचवेळी जेवण देण्यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. भांडण इतके वाढले की रागाच्या भरात विनोदने उशीने सोनालीचे तोंड दाबले. सोनालीचा गुदमरून मृत्यू झाला. मात्र नशेमुळे विनोदला हा प्रकार कळला नाही आणि त्याने रात्रभर सोनालीच्या मृतदेहासोबत झोपवले.

अधिक वाचा: 

Railway Half Ticket : ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी हाफ तिकीट सुरु? छे छे, ही तर अफवा!

सकाळी उठल्यावर त्याने पत्नीला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती उठली नाही. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. घाबरलेल्या विनोदने मित्राला फोन करून सर्व प्रकार सांगितला. या घटनेची माहिती मित्राने तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून विनोदला अटक केली. त्याची चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी