दारु स्वस्त होणार, 'स्पेशल कोरोना टॅक्स' हटवला! 

withdraw the special corona fee: लॉकडाऊन दरम्यान दारुवर लावण्यात आलेला स्पेशल कोरोना टॅक्स आता हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

delhi government has decided to withdraw the special corona fee levied at 70 percent price on all categories of liquor
दारु स्वस्त होणार, 'स्पेशल कोरोना टॅक्स' हटवला!   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दिल्लीत दारूवर 'कोरोना सेस' हटविण्यात आला
  • सोमवारपासून दिल्लीच्या सीमा देखील खुल्या होणार 
  • केजरीवाल यांच्या सरकारने अनलॉकबाबतीत घेतले महत्त्वाचे निर्णय 

नवी दिल्ली: लॉकडाऊन दरम्यान राज्य सरकारांना काही महसूल मिळावा यासाठी मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली होती. त्याचवेळी काही राज्यांनी दारुवर स्पेशल  कोरोना टॅक्स (special corona fee) लावला होता. अशाप्रकारचा टॅक्स लावणारं दिल्ली हे देशातील पहिलं राज्य होतं. आता याच दिल्लीमध्ये मात्र मद्य स्वस्त होणार आहे. केजरीवाल सरकारने आता सर्व दारूच्या ब्रँडवर लावण्यात आलेली विशेष कोरोना फी मागे घेतली आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने सर्व ब्रॅण्डच्या दारूच्या किंमतीवर ७० टक्क्यांपर्यंत स्पेशल कोरोना फी लावली होती. त्यामुळे राजधानीत दारूचे दर वाढले होते.

यापूर्वी दिल्ली सरकारने ५ मे रोजी सर्व ब्रॅण्डच्या दारूच्या किंमतीवर (एमआरपी) ७० टक्के कोरोना उपकर लावला होता. दारूच्या किंमती वाढल्याबद्दल दिल्ली सरकारलाही टीकेचाही सामना करावा लागला होता. तसंच दिल्ली उच्च न्यायालयातही या प्रकरणाला आव्हान देण्यात आले होते.

कोरोना टॅक्समुळे २४ दिवसात १६१ कोटींची कमाई

अलीकडेच दिल्ली सरकारने सांगितले होते की, २४ दिवसांत सर्व ब्रॅण्डच्या दारूवर लावलेल्या कोरोना टॅक्समुळे १६१ कोटींची कमाई झाली होती. दिल्लीत ४ मे ते ३० मे या कालावधीत २३४ कोटी दारु विक्री झाली. तर ७ मे आणि २५ मे रोजी ड्राय डेमुळे दारूची दुकाने बंद होती. यानंतर एकूण २३० कोटींची विक्री केली. यावर दिल्ली सरकारला स्वतंत्रपणे ७० टक्के स्पेशल कोरोना टॅक्सच्या माध्यमातून सुमारे १६१ कोटींची कमाई केली. 

आता का हटविण्यात आला टॅक्स?

प्रत्यक्षात, दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम आणि फरीदाबादसारख्या इतर भागातही दारूचे दर कमी होते. दिल्लीत दारु प्रचंड महागल्याने दारु विक्री सातत्याने कमी होत होती. या सर्व बाबी लक्षात घेऊन दिल्ली सरकारने कोरोना टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १० जूनपासून लागू होणार आहे.

लॉकडाऊनमुळे लोक आधीच आर्थिक पेचात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कोरोना टॅक्स काढून सरकारने लाखो लोकांना मोठा दिलासा दिला आहे.

दिल्लीच्या सीमा उघडण्यात येणार

या व्यतिरिक्त मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली, 'मंत्रिमंडळाच्या बैठकीत समिती आणि लोकांच्या सल्ल्यानुसार दिल्लीच्या सीमा उद्या (सोमवार) उघडल्या जातील. असा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या म्हणजेच ८ जूनपासून सर्व रेस्टॉरंट्स, मॉल आणि धार्मिक स्थळे दिल्लीत उघडली जातील. पण, दिल्लीतील हॉटेल आणि बँक्वेट हॉल बंद राहतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी