Corona Update: राजधानी दिल्लीत कोरोनाचा धोका सर्वाधिक; जाणून घ्या मागील २४ तासांचा डेटा 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 27, 2022 | 18:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

India Corona Update | भारतात मागील २४ तासांत कोरोना व्हायरसचे २,९२७ रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी १,२०३ रूग्ण म्हणजेच जवळपास अर्धे रूग्ण दिल्लीतील आहेत. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

Delhi is most at risk from corona Know the data of last 24 hours
राजधानी दिल्लीत कोरोनाचा धोका सर्वाधिक, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतात मागील २४ तासांत कोरोना व्हायरसचे २,९२७ रूग्ण आढळले आहेत.
  • जवळपास अर्धे रूग्ण दिल्लीतील आहेत.
  • राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

India Corona Update | नवी दिल्ली : भारतात मागील २४ तासांत कोरोना व्हायरसचे २,९२७ रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी १,२०३ रूग्ण म्हणजेच जवळपास अर्धे रूग्ण दिल्लीतील आहेत. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे भारतातील एकूण मृत्यूची संख्या फारशी जास्त नाही. कारण यावेळी कोरोनाच्या गंभीर रूग्णामध्ये घट आहे. (Delhi is most at risk from corona Know the data of last 24 hours). 

३२ मृत्यूंची नोंद 

गेल्या २४ तासांत भारतात ३२ मृत्यूंची नोंद झाली आहे मात्र या आकडेवारीतून असे दिसून येते की ३२ पैकी २२ मृत्यू एकट्या केरळ राज्यातील आहेत. जे आता कोरोनामुळे झालेले मृत्यू मानले जात आहेत. मात्र हे मृत्यू आधीच झाले होते. 

अधिक वाचा : मल्याळम अभिनेता विजय बाबूने बलात्काराचे आरोप फेटाळले

निर्बंध हटवल्याने वाढले रूग्ण 

कोरोनाशी संबंधित सर्व निर्बंध अचानक हटवल्याने, मास्क घालण्यात केलेला निष्काळजीपणा आणि एकाच वेळी शाळा सुरू केल्यामुळे दिल्लीत कोरोना विषाणूची प्रकरणे वाढत आहेत. वाढत्या रूग्णानंतर दिल्ली सरकारला पुन्हा मास्क अनिवार्य करावे लागले आणि ५०० ​​रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दिल्लीसह भारतात, Omicron (B.1.1.529) आणि त्याचा व्हेरिएंट BA.2.12.1 एकत्रितपणे घातक बनत चालला आहे. 

ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट सापडला

दिल्लीतील ILBS म्हणजेच Institute of Liver and Biliary Science मधील Genome Sequencing Lab मध्ये ओमायक्रॉनचा सब-व्हेरिएंट सापडला आहे. नवीन सब-व्हेरिएंट (BA.2.12.1) मधील पॉझिटिव्ह आढळलेले नमुने कोविड-१९ जीनोम सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम INSACOG कडे पाठवण्यात आले आहेत.

दिल्लीमध्ये, BA.2.12.1 चा संसर्ग फक्त एकाच ठिकाणी किंवा संपूर्ण शहरात मर्यादित होता की नाही हे आता अधिक जीनोम सिक्वेसिंगद्वारे तपासले जात आहे. ९ एप्रिलपासून दिल्लीने २५ किंवा त्याहून अधिक सीटी मूल्यांसह नमुने अनुक्रमित करण्यास सुरुवात केली तेव्हा नवीन रूग्ण आढळून आल्याचे उघड झाले. भारतात ९५ टक्के रूग्णांमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन हा सब-व्हेरिएंट आढळून येत आहेत. आतापर्यंत ८ हून अधिक व्हेरिएंट सापडले आहेत आणि ओमायक्रॉनचे आणखी व्हेरिएंट पसरण्याची शंका देखील वर्तवली जात आहे. 

दिल्लीत XE व्हेरिएंटची अद्याप नोंद नाही

 लक्षणीय बाब म्हणजे XE चे व्हेरिएंट अजून दिल्लीत सापडलेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, हा व्हेरिएंट इतर सर्व व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरू शकतो. पंतप्रधानांनी आज जी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली, त्यामध्ये त्यांनी जीनोम सिक्वेन्सिंगवरही भर दिला, जेणेकरून नवीन व्हेरिएंट वेळेत शोधता येतील. मास्क लावल्याने केवळ कोरोनाच नाही तर इतर अनेक आजारांपासूनही बचाव होऊ शकतो आणि दिल्ली एनसीआरच्या प्रदूषित शहरांमध्येही मास्क धूळ आणि धुरापासून संरक्षण करतो, त्यामुळे तज्ज्ञांच्या मते मास्क हा जीवनाचा एक भाग मानला पाहिजे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी