Delhi-Mumbai Expressway Route, 1450 km distance covered: मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला आणखी एक प्रकल्प लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. या वर्षात नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मोदी सरकार अनेक योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी एक म्हणजे दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे (Delhi - Mumbai Expressway).
देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे हा जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे असणार आहे. हा एक्सप्रेस वे ला देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारा ठरणार असल्याचं मानलं जात आहे. या एक्सप्रेस वे वरील सोहना - दौसा टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. देशभरात अनेक एक्सप्रेस वे आहेत मात्र, या एक्सप्रेस वे ची जोरदार चर्चा होत आहे. जाणून घ्या हा एक्सप्रेस वे नेमका आहे तरी कसा?
हे पण वाचा : कोणती फळे साल न सोलता खावी आणि कोणी खाऊ नये?
दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे भारतातीलच नाही तर जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे असेल. या एक्सप्रेस वे ची लांबी जवळपास 1450 किलोमीटर इतकी आहे. हा एक्सप्रेस वे जर्मन तंत्रज्ञानाच्या वापराने तयार करण्यात येत आहे. पुढील 50 वर्षांत या एक्सप्रेस वे वर कोणतेही डागडुजी करण्याची गरज पडणार नाही. या एक्सप्रेस वे च्या कामासाठी जवळपास 12 लाख टन स्टील वापरण्यात येत आहे जे 50 हावडा ब्रिजच्या इतके आहे.
Covering a distance of 1,450 km, the Delhi-Mumbai Expressway is a true example of world-class highway construction. — Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 30, 2023
Lessening the travel time by half, it accelerates economical exercises in two major cities.#PragatiKaHighway #GatiShakti pic.twitter.com/cfRg6EsrTo
या प्रोजेक्टमध्ये 35 कोटी क्युबिक मीटर माती आणि जवळपास 80 लाख टन सिमेंटचा वापर करण्यात येत आहे. देशातील पहिला इसेक्ट्रिक हायवे सुद्धा याच ठिकाणी बनवण्यात येत आहे. या ठिकाणी गाडी धावता धावता रिचार्ज सुद्धा होतील.
"Change in the date" — Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 30, 2023
Now Hon'ble PM Shri @narendramodi Ji will inaugurate the Sohna-Dausa stretch of the #Delhi_Mumbai_Expressway on 12th February. https://t.co/RrNb9WrcHq
दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे हा सध्या आठ लेनचा आहे मात्र, भविष्यात या एक्सप्रेस वे वरील मार्गिका वाढवून 12 करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या एक्सप्रेस वे वर 120 किमी प्रति तास इतक्या वेगाने गाड्या धावणार आहेत. यामुळे दिल्ली ते मुंबई हा प्रवास 12 तासांत पूर्ण करता येणार आहे. सध्या हे अंतर कापण्यासाठी 24 तासांचा काळ लागतो. या एक्सप्रेस वेच्या निर्मितीसाठी 1.1 लाख कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
हे पण वाचा : मासिक पाळीच्या अनियमिततेवर आयुर्वेदिक उपचार
Delhi-Mumbai Expressway सहा राज्यांतून जात आहे. यामध्ये दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी वन्यजीवांसाठी ग्रीन ओवरपास सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच इंडस्ट्रियल कॉरिडोअर सुद्धा तयार केला जात आहे. हा एक्सप्रेस वे देशाच्या प्रगतीचा एक्सप्रेस वे ठरेल असा दावा केला जात आहे.