Metro Horror : मेट्रो स्टेशनवर महिलेसोबत अश्लील वर्तन, CCTV फुटेजमध्ये माथेफिरू कैद

delhi metro news: दिल्ली पोलिसांनी २ जून रोजी जोरबाग मेट्रो स्टेशनवर एका महिलेसमोर लैंगिक चाळे करणाऱ्या माथेफिरू अटक केली आहे.

delhi police find man who had obscene act with a woman at jor bagh metro station see video
Metro: मेट्रो स्टेशनवर महिलेसोबत अश्लील वर्तन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वेड्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अश्लील कृत्य केले.
  • २ जूनला आरोपी जोरबाग मेट्रो स्टेशनमध्ये एका तरुणी जवळ जातो.
  •  तिथे तो मुलीला फाईल दाखवतो आणि पत्ता विचारतो.

obscene act at delhi metro station: दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या वेड्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेसोबत अश्लील कृत्य केले. खरं तर, २ जूनला आरोपी जोरबाग मेट्रो स्टेशनमध्ये एका तरुणी जवळ जातो.  तिथे तो मुलीला फाईल दाखवतो आणि पत्ता विचारतो. मुलगी फाईल बघताच. तो मुलीशी अश्लिल चाळे करताना दिसत आहे. (delhi police find man who had obscene act with a woman at jor bagh metro station see video) 

त्यानंतर महिलाचा आरोप आहे की, तिने माहिती तिथे उपस्थित असलेल्या सीआयएसएफला दिली, मात्र सीआयएसएफ जवानाने महिलेला सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुलीने घरी पोहोचून ट्विटरच्या माध्यमातून याबाबत तक्रार केली, प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांकडून तातडीने कारवाई सुरू झाली, 100 पोलिस तपासात गुंतले.

अधिक वाचा : किडनी स्टोनचे रुग्ण डाळिंब खाऊ शकतात का?

पोलिसांनी 2 जून रोजी दिल्लीतील 164 मेट्रो स्थानकांचे फुटेज तपासले

प्रत्येक टीमला वेगवेगळे काम देण्यात आले. पोलिसांनी 2 जून रोजी दिल्लीतील 164 मेट्रो स्थानकांचे फुटेज स्कॅन केले. त्यानंतर पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपी 2 जून रोजी सिकंदरपूर मेट्रो स्टेशनमधून आत जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी सिकंदरपूर मेट्रो स्थानकाच्या आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली.

अधिक वाचा : रूट कॅनल सर्जरी कशी केली जाते?

एका फुटेजमध्ये आरोपी सलूनमध्ये जाताना दिसत आहे

दिल्ली रेल्वेचे डीसीपी हरेंद्र सिंह आणि डीसीपी मेट्रो जितेंद्र मणी त्रिपाठी यांनी सांगितले की, एका फुटेजमध्ये आरोपी सलूनमध्ये जाताना दिसत आहे. जिथे आरोपींनी पेटीएमद्वारे पैसे भरले होते. तेथून पोलिसांना आरोपी मानव अग्रवालचा सुगावा लागला. गुरुग्राममधील DLF 1 येथे पोलिस त्याच्या घरी पोहोचले तोपर्यंत आरोपी मानव अग्रवाल नेपाळ फरार झाला होता.

अधिक वाचा :  हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी महिलांना निर्माण होतात 'या' समस्या

आरोपीचे वय सुमारे ४० वर्षे असून तो सध्या कोणतेही काम करत नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानव अग्रवाल नेपाळमध्ये बसून दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला आहे.  जो कोर्टाने फेटाळला होता. मंगळवारी साकेत न्यायालयाच्या गेटजवळून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वय सुमारे ४० वर्षे असून तो सध्या कोणतेही काम करत नाही. त्याची दिल्लीत अनेक मालमत्ता आहेत. ज्याच्या भाड्यातून तो घर चालवतो. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत आणि त्याच्या कृत्याचा हिशेब घेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी