Traffic Police: वाहन चलान माफ करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या घरबसल्या कसे करायचे चलान माफ

लोकल ते ग्लोबल
Updated May 11, 2022 | 10:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Delhi Traffic Police Lok Adalat । राजधानी दिल्लीत वाहतुकीचे चलान माफ करण्याची मोठी संधी आहे. खर तर दिल्ली वाहतूक पोलीस राष्ट्रीय लोकअदालत लावणार आहेत. दिल्लीत कोणत्याही वाहनाचे चलान कापले गेले तर ते माफ करण्याची मोठी संधी असणार आहे.

Delhi Police has given a golden opportunity to waive challan at home 
खुशखबर! जाणून घ्या घरबसल्या कसे करायचे चलान माफ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राजधानी दिल्लीत वाहतुकीचे चलान माफ करण्याची मोठी संधी आहे.
  • दिल्लीतील ट्रॅफिक पोलिस १४ मे २०२२ रोजी लोकअदालत आयोजित करणार आहेत.
  • ३१ जानेवारीपूर्वी चलान कापलेल्या वाहनांचेच फक्त चलान माफ केले जाईल.

Delhi Traffic Police Lok Adalat । नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत वाहतुकीचे चलान माफ करण्याची मोठी संधी आहे. खर तर दिल्ली वाहतूक पोलिस राष्ट्रीय लोकअदालत लावणार आहेत. दिल्लीत कोणत्याही वाहनाचे चलान कापले गेले तर ते माफ करण्याची मोठी संधी असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे तुमच्या वाहनाचे चलान माफ करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही त्यासाठी घरबसल्याही बुकींग करू शकता. मात्र बुकिंग केल्यानंतर तुम्हाला कोर्टात जाऊन तुमचे चालान सादर करावे लागेल. (Delhi Police has given a golden opportunity to waive challan at home). 

अधिक वाचा : टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान

दरम्यान, दिल्लीतील ट्रॅफिक पोलिस १४ मे २०२२ रोजी लोकअदालत आयोजित करणार आहेत. सकाळी १० ते दुपारी ३.३० या वेळेत ही न्यायव्यवस्था चालणार आहे. या कोर्टामध्ये तुम्हाला चलान पासून मुक्ती मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला आधी ऑनलाइन बुकिंग करावे लागेल. या बुकिंग दरम्यान तुम्ही तुमच्या वाहनाचा क्रमांक लक्षात ठेवावा कारण लोकअदालतच्या वेबसाइटवर फक्त वाहन क्रमांक टाकावा लागेल.

अशी करा ऑनलाइन बुकिंग

सर्वप्रथम  Delhi Traffic Police Lok Adalat च्या अधिकृत वेबसाइटवर जा. वेबसाइटवरील ऑनलाइन बुकिंग लिंक ११ मे रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. यानंतर तुम्हाला या लिंकवरून तुमच्या ई-चलानची (e-Challan) प्रिंट आउट डाउनलोड करावी लागेल. चलान डाऊनलोड करण्यासोबतच तुम्हाला कोर्टात हजर होण्याची तारीख आणि वेळही लिहावी लागेल. या दिवशी तुम्हाला लोकअदालतीला देखील जायचे आहे. 

३१ जानेवारीपूर्वी चलान कापलेले असणे गरजेचे

जेव्हा तुम्ही तुमचे चलान घेऊन वाहतूक पोलिस लोकअदालतीमध्ये पोहचाल, तेव्हा तुमचे चलान दंडाधिकार्‍यांसमोर सादर केले जाईल, जो तुमचे चलान निकाली काढेल. लक्षणीय बाब म्हणजे दिल्ली पोलिसांनी आधीच ही माहिती दिली आहे की फक्त त्याच वाहनांचे चलन निकाली काढले जाईल ज्यांचे ३१ जानेवारीपूर्वी चलान कापले गेले आहेत.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी