Delhi Violence: दिल्ली पोलिसांचा दावा आतापर्यंत १८ FIR दाखल, १०६ दंगेखोर अटकेत, हेल्पलाइन जारी 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गृह सचिव अजय भल्ला आयबीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. बैठकमध्ये गृहमंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. 

Delhi Police has registered 18 FIRs so far&106 people have been arrested in connection with the incidents in Northeast Delhi
Delhi Violence: दिल्ली पोलिसांचा दावा आतापर्यंत १८ FIR दाखल, १०६ दंगेखोर अटकेत, हेल्पलाइन जारी   |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली :  उत्तर पूर् दिल्ली नागरिकता कायद्यावरून (CAA)वरून उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. सोमवारपासून सुरू असलेल्या उपद्रवींचा तांडवर बुधवारपर्यंत सुरू होता. जाफराबादपासून मौजपूरच्या आसपास अनेक भागात सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली होती. 

दिल्ली पोलिसांनी हिंसाचारासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीची माहिती दिली. यावेळी दिल्ली पोलीसचे पीआरओ एमएस रंधवा यांनी सांगितले की, १८ एफआयआर दाखल करण्यात आल्या असून १०६ जणांना अटक करण्यात आली आहे. जितकेही दंगलखोर आहेत त्यांची ओळख पटली आहे. आम्ही योग्य तेवढी फोर्स तैनात केली आहे. सिनीअर ऑफीसरही मॉनिटर करत आहे. आज कोणतीही घटना घडली नाही. पीसीआर कॉल्स खूप कमी आले आहेत. ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. छतांवरून दगड फेकण्यात आले होते. त्या ठिकाणी ड्रोनद्वारे चेकिंग करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी दगड सापडले आहेत. तेथे कारवाई करण्यात येणार आहे. दंगलखोरांबाबत काही माहिती मिळाली तर हेल्पलाइन क्रमांक - 011- 22829334 आणि 22829335 वर आम्हांला ती शेअर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणतीही अडचण आली तरी वरील क्रमांकावर  दरम्यान पेट्रोलिंग सतत सुरू आहे. 

दिल्लीच्या नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊन नये. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दंगलखोरांविषयी आम्हांला अनेक सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यांच्या विरूद्ध स्ट्रॉंग पुरावे आहेत.  त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 

 

 

 

 

अजित डोभाल यांनी केला प्रभावित भागाची पाहणी 

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभालने दंगलग्रस्त उत्तर पूर्व दिल्लीच्या काही भागाला भेट दिली. त्यानंतर बोलताना म्हणाले परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस आपले काम करत आहे. 

काही ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले तर एक दोन ठिकाणी दोन उत्तेजित व्यक्तींनी हिंसेबाबत त्यांच्याकडे तक्रार केली. गेल्या २४ तासात दंगलग्रस्त भागाची डोभाल यांनी दुसऱ्यांदा पाहणी केली आहे. 

जाफराबाद येथे एक तरूणी त्यांच्याकडे आली. ती म्हणाली आम्ही या भागात सुरक्षित असल्याचे वाटत नाही. जेव्हा दंगलखोर आमचे दुकानं जाळत होती. तेव्हा पोलीस निष्क्रीय होती. त्यावर डोभाल म्हणाले, की मी तुम्हांला सांगतो की तुम्ही सुरक्षित आहात. 

त्यानंतर ही तरुणी सुरक्षित घरी पोहचली पाहिजे याबाबत डोभाल यांनी पोलिसांना सुचना दिल्या. 
 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...