Munawar Faruqui : दिल्ली : हैदाराबादमध्ये कॉमेडी शो झाल्यानंतर मुनव्वर फारुकीचा दिल्लीत एक शो होणार होता. परंतु कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव फारुकीला परवानगी नाकारण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेने फारुकीच्या शोला विरोध केला होता. (delhi police permission denied comedian Munawar Faruqui show over affecting communal harmony)
काही दिवसांपूर्वी मुनव्वर फारुकीचा कॉमेडी शो झाला होता. त्यावेळी भाजप आमदार टी राजा सिंह यांनी फारुकीच्या शोला विरोध केला आणि जर फारुकीचा शो झाला तर आपले कार्यकर्ते हा शो उधळून लावू असा इशारही दिला होता. तेव्हा तेंलगाणा सरकारने सुरक्षा पुरवल्यानंतर हैदराबादमध्ये फारुकीचा शो पार पाडला. त्यानंतर टी राजा सिंह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून फारुकीला शिवीगाळ केली होती. तसेच प्रेषित मोहम्मदत पैंगबर यांच्यावर वादग्रस्त विधानही केले होते. त्यामुळे हैदराबादमध्ये मुस्लिम समाजाने पोलिसांत राजा सिंह विरोधात तक्रार दाखल केली. य प्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार राजा सिंह यांना अटक केली होती. राजा सिंह यांच्या विधानामुळे हैदराबादमध्ये तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले होते.
Licensing unit of Delhi police rejects permission to stand-up comedian Munawar Faruqui to perform his show scheduled for August 28th in Delhi — ANI (@ANI) August 27, 2022
This comes after the central district police wrote a report to the unit stating that "the show will affect communal harmony in the area." pic.twitter.com/tMPvvb6C2T
आता दिल्लीत मुनव्वर फारुकीचा एक कॉमेडी शो होणार होता. परंतु विश्व हिंदू परिषदेने फारुकीच्या शोला विरोध केला होता. २८ ऑगस्ट रोजी फारुकीचा दिल्लीत शो होणार होता, विश्व हिंदू परिषदेने फारुकीचा शो होऊ नये यासाठी दिल्ली पोलिसांना निवेदन दिले होते. आता दिल्ली पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तसेच सामाजिक सौहार्दता धोक्यात येईल या कारणाने फारुकीच्या शोला परवानगी देण्यास नकार दिला आहे.
Vishwa Hindu Parishad (VHP) had also written to Delhi Police Commissioner Sanjay Arora seeking the cancellation of stand-up comedian Munawar Faruqui's show on August 28th in Delhi. — ANI (@ANI) August 27, 2022