Air Indiaच्या विमानात सू करणारा आरोपी शंकर मिश्रा अटकेत; बंगळुरुमध्ये दिल्ली पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Air India Flight urinated Case: एअर इंडियाच्या विमानात  (Air India Urinating Case) मद्यधुंद अवस्थेत महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा (Shankar Mishra)याला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)अटक केली आहे.  दिल्ली पोलिसांनी बंगळुरूमधून (Bengaluru)शंकर मिश्राला अटक केली आहे. काल रात्री दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपी मिश्राला दिल्ली आणण्यात आले आहे.

Delhi police Shankar Mishra arrested
Air Indiaच्या विमानात सू करणारा आरोपी शंकर मिश्रा अटकेत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आरोपी शंकर मिश्रा याला आज न्यायालयात हजर केले जाणार
  • शंकर मिश्राचं शेवटचं लोकेशन बंगळुरूमध्ये सापडलं होतं.
  • मिश्राला पकडण्यासाठी तयार करण्यात आलेली टीम मुंबई आणि बेंगळुरूला पाठवण्यात आली होती.

Air India Flight urinated Case: एअर इंडियाच्या विमानात  (Air India Urinating Case) मद्यधुंद अवस्थेत महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा (Shankar Mishra)याला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)अटक केली आहे.  दिल्ली पोलिसांनी बंगळुरूमधून (Bengaluru)शंकर मिश्राला अटक केली आहे. काल रात्री दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपी मिश्राला दिल्ली आणण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शंकर मिश्रा याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस आरोपींच्या रिमांडची मागणी करणार असून कडक कारवाई करणार आहे.  (Delhi police Shankar Mishra arrested; accused of urinated in Air India flight) 

अधिक वाचा  : Sanjay Raut यांच्या अडचणीत वाढ; अजामीनपात्र वॉरंट जारी

 बंगळुरूमध्ये मिश्राचे लास्ट लोकेशन 

शंकर मिश्राचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की मिश्राला पकडण्यासाठी तयार करण्यात आलेली टीम मुंबई आणि बेंगळुरूला पाठवण्यात आली होती. परंतु शंकर मिश्राचं शेवटचं लोकेशन बंगळुरूमध्ये सापडलं होतं. त्याच्या आधारे शंकर मिश्राचा बंगळुरूमध्ये शोध घेण्यात आला. मात्र मिश्रा त्याचा फोन सातत्यानं बंद करत होता. त्यामुळे त्याला शोधण्यात अनेक अडचणी आल्या. अखेर त्याला अटक करण्या बंगळुरू पोलिसांना यश आले.  

अधिक वाचा  : आमदार कदम यांचा अपघात; घातपाताचा संशय

सू केल्यामुळे नोकरीही गेली 

आरोपी शंकर मिश्रा मागील वर्षाच्या 26 नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या विमानातून बिझनेस क्लासने प्रवास करत होता. यावेळी त्याने एका वृद्ध महिले जवळ जात त्याने लघुशंका केली. मिश्रा हे कॅलिफोर्निया येथील एका अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनीच्या भारतीय युनिटचे उपाध्यक्ष आहेत. परंतु ही घटना घडकीस आल्यानंतर त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. 

अधिक वाचा  : सूर्याच्या पृष्ठभागावर झाला मोठा स्फोट

महिला आयोगाने जाब विचारला

दिल्ली महिला आयोगाने (DCW) नुकत्याच एअर इंडियाच्या दोन फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या कथित गैरवर्तनाबद्दल दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. या घटनांना "अत्यंत त्रासदायक आणि गंभीर" म्हणत आयोगाने या प्रकरणांमध्ये दाखल केलेल्या एफआयआर आणि अटक केलेल्यांची माहिती मागवली. 

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघवी केल्याच्या प्रकरण म्हणजे  "एका व्यक्तीवर आलेलं संकट ही दुसऱ्यासाठी थट्टेचा विषय बनत असते." ही म्हण सिद्ध झाली आहे. दरम्यान, या घटनेबाबत सोशल मीडियावर जोक्स आणि मीम्सचा पाऊस पडला आहे. त्यांच्या माध्यमातून लोक एअर इंडियाला वेठीस धरत आहेत.

विमान कंपनीकडून नुकसान भरपाईची हवी  

एअर इंडियाच्या विमानातील लघुशंका प्रकरणात शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी आरोपीचं म्हणणं ठेवत सांगितलं होतं की, या घटनेनंतर महिलेनं शंकरला माफ केलं होतं. व्हॉट्स अॅपवरील चॅटद्वारे याची पुष्टी झाली आहे. शंकरनं कपडे धुवून पाठवून दिल्याचं तसेच नुकसान भरपाई म्हणून 15 हजार रुपयेही देण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. ही रक्कम महिलेच्या मुलीनं परत केली. विमान कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून महिलेनं ही तक्रार केली आहे, असंही निवेदनात म्हटलं होतं.  

मुलावरील आरोप बिनबुडाचे 

या घटनेनंतर शंकर मिश्रा याच्या वडिलांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेने शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. तर या महिलेने शंकर मिश्रा याच्याकडून काही पैसे उकळले असून ती ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी