दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता: दिल्ली पोलीस सतर्क; आखली नवी रणनिती, उधळणार दहशतावाद्यांचा डाव

ऐन सणाच्या काळात दहशतवादी कारवाई होण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांचा कट उधळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अॅक्शन प्लान आखला आहे

Delhi Police to thwart terrorist plots
दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; दिल्ली पोलीस सतर्क  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • देशात सणांचा हंगाम आहे, या काळात दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतात.
  • स्थानिक गुन्हेगार, गुंड आणि अशा हल्ल्यांना मदत करू शकतात.
  • सुरक्षेसाठी या परिसरात संध्याकाळी 5 ते 12 या वेळेत पोलिसांची गस्त राहणार

नवी दिल्ली: ऐन सणाच्या काळात दहशतवादी कारवाई होण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांचा कट उधळण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अॅक्शन प्लान आखला आहे. सुत्रानुसार पेट्रोल पंप आणि पेट्रोल ट्रॅकर्सचा दहशत पसरवण्यास  टारगेट केलं जाऊ शकतं. ही बाब लक्षात बैठक घेऊन सुरक्षा अधिक कडक करण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले आहेत. 

दहशतवाद्यांचा उधळणार कट

देशात सणांचा हंगाम आहे, या काळात दहशतवादी हल्ला घडवून आणू शकतात. हे पाहता दिल्ली पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. शनिवारी झालेल्या दिल्ली पोलीस आयुक्त आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दहशतवादाचा सामना करण्याच्या मुद्द्यावर जोर देण्यात आला. 

पोलिसांना मिळाली गुप्त माहिती 

बैठकीत असे सांगण्यात आले की, अफगाणिस्तानच्या संकटामुळे दिल्लीवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे आणि हल्लेखोरांना स्थानिक पाठिंबा असल्याशिवाय असा कोणताही हल्ला होऊ शकत नाही.  स्थानिक गुन्हेगार, गुंड आणि अशा हल्ल्यांना मदत करू शकतात, म्हणून भाडेकरू आणि कामगारांची पडताळणी आवश्यक आहे. यासाठीची मोहीम लवकरच सुरू केली जाणार आहे. 

या ठिकाणांवर पोलिसांची राहिल बारीक नजर 

याशिवाय सायबर कॅफे, केमिकल शॉप, पार्किंग, स्क्रॅप डीलर्स आणि कार डीलर्स इत्यादींची व्यावसायिक तपासणी असावी. कम्युनिटी पोलिसिंग केले पाहिजे, ज्यामध्ये आरडब्ल्यूए, एमडब्ल्यूए, पोलिसांचे डोळे, कान आणि वॉचडॉग यांनी अमन समितीची बैठक घ्यावी यावरही बैठकीत भर देण्यात आला.  सुरक्षेसाठी या परिसरात संध्याकाळी 5 ते 12 या वेळेत पोलिसांची गस्त राहणार आहे. बीट कर्मचाऱ्यांना 12 वाजेपर्यंत परिसरात राहण्याच्या सूचना आहेत. 6 ते 9 साठी नवीन कर्मचारी तैनात केले जातील.

दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी उपनिरीक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की एसएचओनी त्यांच्याकडून काम घ्यावे. पदवीधर सैनिकांकडून तपास करा. बैठकीत दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी रोहिणी न्यायालयात पोलिसांच्या त्वरित कारवाईचे कौतुक केले आहे आणि पोलिसांना अधिक व्यावसायिक पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी