[VIDEO] सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला तरुण, मृत्यू समोर दिसताच बसली पाचावर धारण, पाहा व्हायरल व्हिडिओ

Man falls in Lionyard: दिल्लीच्या एका प्राणीसंग्रहालयात एक तरुण अचानक सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

delhi zoo official saved a who man jumped into lions domainb see video  
[VIDEO] सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला तरुण, मृत्यू समोर दिसताच बसली पाचावर धारण, पाहा व्हायरल व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात एक तरुण अचानक घुसला सिंहाच्या पिंजऱ्यात
  • सिंहाच्या पिंजऱ्यात घुसलेल्या तरुणाची करण्यात आली सुटका
  • दिल्ली प्राणीसंग्रहालयातील संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद

नवी दिल्ली: २०१४ साली एक अशी घटना घडली होती की, ज्यामध्ये दिल्लीती एक तरुण अचानक प्राणीसंग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात पडला होता. ज्यानंतर वाघाने त्याचा जीव घेतला होता. त्यावेळी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याने काही क्षणात व्हायरल झाली होती. आज देखील पुन्हा तशीच घटना घडली आहे. फक्त फरक एवढाच आहे की, सिंहाच्या पिंजऱ्यात पडलेल्या या व्यक्तीचं नशीब चांगलं होतं की, ज्याचा जीव अगदी थोडक्यात वाचला. 

सोशल मीडियावर आज (गुरुवार) एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण सिंहाच्या पिंजऱ्यात जाताना दिसतो आहे. एका झाडाजवळ सिंह आणि तो तरुण एकमेकांसमोर आले. त्यावेळी तरुणाची अवस्था नेमकी काय झाली असेल याचा आपण अंदाजही व्यक्त करु शकत नाही. ही घटना दिल्ली प्राणीसंग्रहालयात (Delhi Zoo) मध्ये घडली आहे. 

थेट सिंहाच्या पिंजऱ्यात घुसलेल्या या तरुणाचं नाव रेहन खान असं असून तो २८ वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण बिहारमधील असून तो मानसिक रुग्ण असल्याचं सांगण्यात येत आहे. 

 

 

दरम्यान, या व्हिडिओबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही की, तो सिंहाच्या पिंजऱ्यात नेमका कसा आणि कधी घुसला. तो चुकून त्या पिंजाऱ्यात गेला की, जाणूनबुजून याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. जेव्हा हा तरुण या ठिकाणी एका झाडाजवळ पोहचतो तेव्हा सिंह देखील त्याच्याजवळ येतो आणि सुरुवातीला फक्त त्याच्याकडे पाहतो. यावेळी हा तरुण देखील अस्वस्थ झालेला दिसून येतो. एके क्षणी तो सिंहाला घाबरुन थेट जमिनीवर झोपतो देखील. तर दुसऱ्याच क्षणी सिंह या तरुणाच्या जवळ जाऊन त्याच्यावर पंजा देखील उगारतो. 

 

 

दुसरीकडे काही वेळातच तरुण सिंहाच्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांना मिळते. ज्यानंतर त्यांनी तात्काळ तिथे धाव घेऊन तरुणाची सिंहापासून सुटका केली. सिंहाच्या पिंजऱ्यातून बाहेर आल्यानंतर तरुणाचा एका फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो खूपच घाबरलेला दिसतो आहे. त्यामध्ये त्याचे कपडे देखील फाटलेले दिसत आहेत. दरम्यान, प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी या तरुणाला आपल्या ताब्यात घेतलं असून सध्या ते त्याची चौकशी करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी