दिल्लीची सर्वात मोठी बातमी; AK-47 आणि शस्त्र साठ्यासह पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, घातपाताचा कट उधळला

शाची राजधानी दिल्लीवर (Capital Delhi) सध्या दहशतवादी हल्ल्याच्या संकट घोंघावत आहे. अशातच दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) दक्षतेमुळे दिल्लीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला (Pakistani terrorists) अटक करण्यात आली आहे.

 Pakistani terrorist arrested with AK-47 and weapons
AK-47 आणि शस्त्र साठ्यासह पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी टार्गेट किलिंग करू शकतात.
  • सणांचा फायदा घेत ते गर्दीच्याा ठिकाणी दहशतावादी हल्ला करू शकतील.
  • दिल्ली सापडलेल्या दहशतवाद्याचे साथीदार इतर ठिकाणी लपवून बसल्याचा पोलिसांना संशय

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीवर (Capital Delhi) सध्या दहशतवादी हल्ल्याच्या संकट घोंघावत आहे. अशातच दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) दक्षतेमुळे दिल्लीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला (Pakistani terrorists) अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून एक AK-47 गन आणि इतर शस्त्रसाठा जप्त केला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने पूर्वी दिल्लीच्या लक्ष्मी नगर परिसरातून पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. 

बनावट कागदपत्राद्वारे बनवलं भारताचे ओळखपत्र

अटक केलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव मोहम्मद अशरफ उर्फ ​​अली आहे. (Terrorist Mohammad Ashraf aka Ali)  दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी मोहम्मद अशरफ उर्फ अली नावाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दहशतवादी मोहम्मद अशरफ अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होता. बनावट कागदपत्रांच्या मदतीने दहशतवाद्याने भारताचे ओळखपत्रही बनवले होते. 

दहशतवाद्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त 

पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये एके-47 रायफल, काडतुसे, एक हँड ग्रेनेड, 2 पिस्तूल आणि 50 काडतुसे जप्त कऱण्यात आली आहेत. तसेच त्याच्याकडून एक बनावट पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. या दहशतवाद्याला अटक करुन सणासुदीच्या काळात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा घातपाताचा कट उधळला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने दहशतवादी मोहम्मद अशरफ उर्फ ​​अलीला UA (P) कायदा, स्फोटक कायदा(Explosive Act)  आणि शस्त्र कायदा (Arms Act) अंतर्गत अटक केली आहे.

दहशतवाद्याची दिल्ली पोलिसांकडून चौकशी 

दरम्यान पाकिस्तानी दहशतवादी राजधानीत लपले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच मिळाली होती.  पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्याचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दिल्ली पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते. सध्या दहशतवादी मोहम्मद अशरफ यांची चौकशी केली जात आहे.

पोलीस पाकिस्तानी दहशतवाद्याच्या साथीदारांचा शोधात 

दहशतवादी मोहम्मद अशरफ यांच्यासोबत आणखी किती लोक आहेत हे जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. दहशतवादी मोहम्मद अशरफचे साथीदार इतर अनेक ठिकाणी लपले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.  दिल्ली पोलीस इतरही अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी टार्गेट किलिंग करू शकतात. या व्यतिरिक्त, ते सणांच्या दरम्यान लोकांना लक्ष्य करू शकतात. सध्या नवरात्री सुरू आहे. यामुळे मंदिरांमध्येही भाविकांची गर्दी असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी