दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिला राजीनामा

Delhi's LG Anil Baijal resigned, told that the decision was taken due to personal reasons : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला. अनिल बैजल यांनी त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला आहे.

Delhi's LG Anil Baijal resigned
दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिला राजीनामा 
थोडं पण कामाचं
  • दिल्लीच्या नायब राज्यपालांनी दिला राजीनामा

Delhi's LG Anil Baijal resigned, told that the decision was taken due to personal reasons : नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा दिला. अनिल बैजल यांनी त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. पाच वर्ष आणि चार महिने दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून काम केल्यानंतर अनिल बैजल यांनी राजीनामा दिला. नजीब जंग यांनी राजीनामा दिल्यानंतर बैजल यांनी ३१ डिसेंबर २०१६ रोजी दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारला होता.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल यांच्यात अनेकदा संघर्ष झाला. यामुळे नायब राज्यपालांच्या राजीनाम्यावरून चर्चेला उधाण आले आहे.

अनिल बैजल १९६९च्या बॅचचे AGMUT (Arunachal Pradesh-Goa-Mizoram and Union Territory - AGMUT) कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांनी दिल्ली विकास प्राधिकरणचे उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. वाजपेयी सरकारच्या काळात ते गृह सचिव होते. यूपीए सरकारच्या काळात त्यांना शहर विकास मंत्रालयाचे सचिव करण्यात आले. त्यांनी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर आधुनिकीकरण मिशन अंतर्गत ६० हजार कोटी रुपयांच्या योजनांचे काम हाताळले. प्रशासकीय अधिकारी म्हणून ३७ वर्षांच्या सेवेत त्यांनी इंडियन एअरलाइन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, प्रसार भारती निगमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोव्याचे विकास आयुक्त, नेपाळमध्ये भारताच्या मदत मोहिमेचे सल्लागार प्रभारी म्हणून काम केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी