नवी दिल्ली: Demolition of twin towers in Noida: नोएडामध्ये (Noida) अनधिकृत ट्विन टॉवर (Twin Tower) पाडण्याची (demolish) तयारी पूर्ण झाली आहे. दोन्ही इमारतींमध्ये एकूण 850 फ्लॅट आहेत. हे नोएडा-ग्रेटर ( Noida-Greater Noida Expressway)नोएडा एक्सप्रेसवे जवळ सेक्टर 93A मध्ये आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटके (explosives ) बसवण्याचे आणि जोडण्याचे सर्व काम पूर्ण झाले आहे. दिल्लीतील कुतुबमिनारपेक्षा ( Qutub Minar) 100 मीटर उंच या इमारती पाडण्यासाठी 3700 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ट्विन टॉवर पाडताना आजूबाजूची परिस्थिती सुरक्षित राहावी यासाठी प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. सर्व खबरदारीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्फोटानंतर उठणारी धूळ आणि धूर मर्यादित ठेवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच रुग्णालयांना आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचा इशाराही देण्यात आला असून आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे.
अधिक वाचा- ED ची नजर आता पवार कुटुंबियांवर, आमदार रोहित पवार आता रडारवर
ट्विन टॉवर्सच्या दोन जवळच्या सोसायटी - एमराल्ड कोर्ट आणि एटीएस व्हिलेजमधील 5,000 हून अधिक रहिवासी आणि त्यांच्या 150 ते 200 पाळीव प्राण्यांना बाहेर काढण्यात येत आहे. दोन्ही आवारातून सुमारे 3000 वाहनेही हटवण्यात येणार आहेत. स्फोटापूर्वी ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवरील वाहतूकही दुपारी 2 ते 3 या वेळेत बंद राहणार आहे. परिसरात ड्रोन उडवण्यासही बंदी घातली आहे.
ढिगाऱ्याची किंमत कोट्यवधी
नोएडा ट्विन टॉवर्स कोसळतील तेव्हा ढिगाऱ्यासोबत 35,000 घनमीटर धूळही निर्माण होणार आहे. हे तिथून काढण्यासाठी एकाच वेळी 1200 ते 1300 ट्रक लागणार आहेत. दरम्यान ढिगाऱ्याची किंमत 13 कोटींपर्यंत असेल. टॉवर पाडण्यासाठी सुमारे 18 कोटी रुपये खर्च येणार आहे.
2:30 वाजता होणार धमाका
नोएडाचे ट्विन टॉवर्स पाडण्याची वेळ आज 28 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2.30 वाजता निश्चित करण्यात आली आहे. 9 ते 12 सेकंदात 3700 किलो स्फोटकं या इमारती उद्धवस्त करतील. त्यासाठी इमारतींमध्ये 9 हजार 640 छिद्रे करून हा बारूद भरण्यात आला आहे.