Corona नंतर आता डेंग्यूचा जीवघेणा धोका, एनसीआरपासून अनेक राज्यांमध्ये वाढला डेंग्यूचा ताप

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 23, 2021 | 12:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

एकीकडे देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे तर दुसरीकडे डेंग्यूने सातत्याने डोके वर काढत आहे. एनसीआरसह यूपी आणि राजस्थानमधील अनेक भाग सध्या डेंग्यूच्या विळख्यात आहेत.

Dengue fever rises as corona outbreak spreads to many states from NCR
Corona नंतर आता डेंग्यूचा जीवघेणा धोका, एनसीआरपासून अनेक राज्यांमध्ये वाढला डेंग्यूचा ताप   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 •  दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण
 • राजधानीच्या सर गंगा राम रुग्णालयात डेंग्यूचे समर्पित वॉर्ड सुरू करण्यात आला
 • राजस्थानमध्येही डेंग्यूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.

नवी दिल्ली : जेव्हा कोरोनाचा कहर शमला, तेव्हापासून देशात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्ली-एनसीआरपासून उत्तर प्रदेश आणि राजस्थानपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा उद्रेक सातत्याने वाढत आहे. सर्वात वाईट परिस्थिती दिल्लीत आहे. दिल्लीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या दिल्लीच्या रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे 221 रुग्ण दाखल आहेत. दिल्लीत डेंग्यूचे रुग्ण वाढत असून डेंग्यूच्या आजार दिल्लीकर हैराण झाले आहेत. (Dengue fever rises as corona outbreak spreads to many states from NCR)

आकडेवारी पहा-

 1. 2015 मध्ये दिल्लीत डेंग्यूचे 14 हजार 889 रुग्ण आढळले होते. 60 लोकांचा मृत्यू झाला होता.
 2. 2016 मध्ये, 3650 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
 3. 2017 मध्ये 3829 प्रकरणे नोंदवली गेली, 10 लोकांचा मृत्यू झाला.
 4. 2018 मध्ये 1595 केस रिपोर्ट होते, 4 लोकांचा मृत्यू झाला.
 5. 2019 मध्ये 1069 प्रकरणे नोंदवली गेली. तर २ रुग्णांना जीव गमवावा लागला होता.
 6. 2020 मध्ये, 612 प्रकरणे नोंदवली गेली. 1 मरण पावला होता.
 7. पण डेंग्यू अब की बार डेंग्यूने गेल्या वर्षीचा विक्रम मोडला.
 8. या वर्षी 16 ऑक्टोबरपर्यंत राजधानीत 723 डेंग्यूचे रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

केसेसमध्ये सातत्याने वाढ होत आहे

डेंग्यूसदृश लक्षणे असलेले रुग्ण दिल्लीतील रुग्णालयात मोठ्या संख्येने पोहोचत आहेत. रुग्णांची परिस्थिती पाहता दिल्ली सरकारने रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव खाटांची संख्या कमी केली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी राखीव असलेल्या खाटांची संख्या 30 टक्क्यांवरून आता केवळ 10 टक्के करण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे

राजस्थानमध्येही डेंग्यूने थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्ण संख्येत  इतकी वाढत चालली आहे की, रुग्णालयांच्या आत आणि बाहेर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गेल्या वर्षी राजस्थानमध्ये डेंग्यूचे १३३१ रुग्ण होते, मात्र यंदा एकाच महिन्यात हा आकडा साडेसहा हजारांच्या पुढे गेला आहे. राजस्थानमधील 33 पैकी 30 जिल्हे डेंग्यूच्या विळख्यात आले आहेत. जयपूरमध्ये सुमारे 1500 रुग्ण आढळले आहेत. कोटामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 700 च्या पुढे आहे. कोटामध्ये अनेक लोकांना एकाच बेडवर एकाच वेळी उपचार करावे लागतात. करौली, झालावाड, अलवर, चुरू या भागातही डेंग्यूचा डंका आहे. मात्र यामुळे सुमारे 100 जणांना जीव गमवावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.

यूपीमध्येही डेंग्यू

डेंग्यूने उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांनाही आपल्या कवेत घेतले आहे. प्रयागराज आणि मुरादाबादमध्ये अशा रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. देशातील अनेक राज्ये आणि शहरांमध्ये परिस्थिती अशी आहे की, कोरोनानंतर आता डेंग्यूने जीवघेणा धोका निर्माण केला आहे. या धोक्याला पराभूत करणे आवश्यक आहे, परंतु या क्षणी ते होताना दिसत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी