Deoghar Ropeway Accident: झारखंडमध्ये बचावकार्यात अपघात, दीड हजार फुटांवरून पडून महिलेचा मृत्यू, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

झारखंडमध्ये देवघर रोपवे अपघातात बचाव कार्यात पुन्हा एक अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रॉलीच्या केबिनमधून काढताना ही महिला खाली पडली आणि जखमी झाली. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

deoghar accident
देवघर रोपवे अपघात   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • झारखंडमध्ये देवघर रोपवे अपघातात बचाव कार्यात पुन्हा एक अपघात झाला आहे.
  • या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
  • ट्रॉलीच्या केबिनमधून काढताना ही महिला खाली पडली आणि जखमी झाली.

Deoghar Ropeway Accident : रांची : झारखंडमध्ये देवघर रोपवे अपघातात बचाव कार्यात पुन्हा एक अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेला रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रॉलीच्या केबिनमधून काढताना ही महिला खाली पडली आणि जखमी झाली. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात मृतांचा आकडा ४ वर पोहोचला आहे. मृत महिला देवघरच्या झौंसागढीची रहिवासी असून त्यांचे नाव शोभा देवी होते.  

मिळालेल्या माहितीन्सुआर त्रिकूट पर्वतरांगेत ट्रॉली क्रमांक ७ मधून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने अडकलेल्या लोकांना काढण्यात येत होते. तेव्हा एक महिलेला हेलिकॉप्टमधून सोडलेल्या रशीतून केबिनमधून बाहेर काढण्यात आले. जेव्हा महिलेला या रशीला बांधले तेव्हा ही रशी वर येण्या ऐवजी खाली जात होती. तेव्हा रशीला एक झटका बसला. ही रशी कुठेतरी अडकल्याचे कळाले. त्यानंतर पुन्हा रशीला एक झटका बसला आणि महिला खाली कोसळली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. महिलेचे वजन जास्त होते त्यामुळे हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे. 


सोमवारी बचावकार्यादरम्याने क तरुण हेलिकॉप्टरवरून जवळपास २ हजार फुटांवरून खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारीही या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी