जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांची नियुक्ती

deploying additional forces in Jammu Kashmir केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संख्येने सुरक्षा पथकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. 

deploying additional forces in Jammu Kashmir
जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांची नियुक्ती  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • जम्मू काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांची नियुक्ती
  • सीआरपीएफच्या ३० कंपन्या आणि बीएसएफच्या २५ कंपन्या जम्मू काश्मीरमध्ये नियुक्त
  • गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा पथके परस्पर समन्वय राखून दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी सक्रीय

deploying additional forces in Jammu Kashmir । नवी दिल्ली: दहशतवाद्यांनी सामान्यांच्या हत्या करण्याचे सत्र सुरू केले आहे. हे प्रकार थांबावेत आणि सर्व दहशतवाद्यांचा बीमोड करणे सोपे व्हावे यासाठी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संख्येने सुरक्षा पथकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. 

सीआरपीएफच्या ३० कंपन्या आणि बीएसएफच्या २५ कंपन्या जम्मू काश्मीरमध्ये नियुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सुरक्षा पथकांनी दहशतवाद्यांना विविध पद्धतीने मदत करणाऱ्या अनेकांची धरपकड करुन चौकशी सुरू केली आहे. 

जम्मू काश्मीरमध्ये निवडक ठिकाणी आधुनिक कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. हे कॅमेरे दिवस असो वा रात्र प्रत्येक व्यक्तीचा चेहरा अचूक टिपतात. तसेच सरकारी डिजिटल माहितीशी पडताळणी करुन संबंधित ठिकाणी असणारी व्यक्ती धोकादायक आहे की नाही याची माहिती सुरक्षा पथकांच्या नियंत्रण कक्षाला देतात. यामुळे स्थानिकांसारखे कपडे घालून गर्दीत मिसळणाऱ्या दहशतवाद्यांना शोधणे सुरक्षा पथकांना सोपे होणार आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा पथके परस्पर समन्वय राखून दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी सक्रीय झाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी