देव दिवाळीसाठी 10 लाख दिवे, 50 टन फुलं अशी जय्यत तयारी

dev diwali will be celebrated in kashi today with grand preparations : आज (सोमवार 7 नोव्हेंबर 2022) देव दिवाळी आहे. उत्तर प्रदेशमध्ये वाराणसीत देव दिवाळी साजरी होणार आहे.

dev diwali will be celebrated in kashi today with grand preparations
देव दिवाळीसाठी 10 लाख दिवे, 50 टन फुलं अशी जय्यत तयारी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • देव दिवाळीसाठी 10 लाख दिवे, 50 टन फुलं अशी जय्यत तयारी
  • आज सूर्यास्तानंतर संध्याकाळी देव दिवाळी साजरी करत गंगा नदीची आरती केली जाईल
  • उत्तर प्रदेशमध्ये वाराणसीत देव दिवाळी साजरी होणार

dev diwali will be celebrated in kashi today with grand preparations : आज (सोमवार 7 नोव्हेंबर 2022) देव दिवाळी आहे. उत्तर प्रदेशमध्ये वाराणसीत देव दिवाळी साजरी होणार आहे. वाराणसी हे शहर काशी या नावानेही ओळखले जाते. काशीत गंगा नदीच्या किनाऱ्यावर देव दिवाळी साजरी होणार आहे. आज सूर्यास्तानंतर संध्याकाळी देव दिवाळी साजरी करत गंगा नदीची आरती केली जाईल. 

देव दिवाळीसाठी काशी विश्वनाथाचा दरबार सज्ज होत आहे. 10 लाख दिवे आणि 50 टन फुलांचा वापर करून सजावट केली जाणार आहे. देव दिवाळी निमित्त 51 देवकन्या गंगा नदीची आरती करणार आहेत. हा सोहळा बघण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक गंगा नदीच्या किनाऱ्यावर उपस्थित असतील. 

हिंदू, शिखांसाठी महत्त्वाची कार्तिक पौर्णिमा

Vastu Tips:पूजेच्या घरात चुकूनही ठेवू नका 'या' 6 गोष्टी, होतो त्याचा अशुभ परिणाम

Chandra Grahan 2022: चंद्रग्रहणात करा 'या' गोष्टींचे दान, सर्व दुःखातून मिळेल मुक्ती; लवकरच मिळेल मनासारखी नोकरी

काशीत गंगा नदीच्या किनाऱ्यावर 84 घाट आहेत. या सर्व घाटांवर मिळून किमान 10 लाख दिवे आणि 50 टन फुलांद्वारे सजावट सुरू आहे. संध्याकाळी गंगा आरती बघण्यासाठी किमान 5 लाख नागरिक उपस्थित असतील असा प्राथमिक अंदाज आहे. आज देव दिवाळी निमित्त 51 देवकन्या गंगा नदीची आरती करणार आहेत. मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी इंडिया गेटची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देव दिवाळीच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच नागरिकांना ट्वीट करून देव दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. 

  1. देव दिवाळीचा शुभ मुहूर्त : सोमवार 7 नोव्हेंबर 2022, संध्याकाळी 5.14 ते संध्याकाळी 7.49 (2 तास 35 मिनिटे देव दिवाळीचा शुभ मुहूर्त)
  2. देव दिवाळी : सोमवार 7 नोव्हेंबर 2022, संध्याकाळी 4.15 पासून सुरू (कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळी)
  3. देव दिवाळीची समाप्ती : मंगळवार 8 नोव्हेंबर 2022, संध्याकाळी 4.31 वाजता (कार्तिक पौर्णिमा समाप्ती, देव दिवाळीचा समारोप)
  4. सिद्धी योग : सोमवार 7 नोव्हेंबर 2022, रात्री 10.37 पर्यंत
  5. रवि योग : सोमवार 7 नोव्हेंबर 2022, रात्री 12.37 पर्यंत

अशी साजरी करा देव दिवाळी

नदीत किंवा घरातील आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा. नंतर भगवान शंकराची विधीवत पूजा करा. नदी, सरोवर किंवा तलावाच्या काठी जा. भगवान शंकर तसेच कुलदेवतेचे नामस्मरण करा. तुपाचा दिवा लावा. घरी पण देवासमोर उभे राहून भगवान शंकर तसेच कुलदेवतेचे नामस्मरण करा. तुपाचा दिवा लावा.

देव दिवाळीची कथा

कार्तिक पौर्णिमेला शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. यानंतर आनंदीत झालेल्या देवी देवतांनी शंकराची नगरी काशी येथे उत्सव साजरा केला. गंगा नदीच्या किनाऱ्यावर दीपावली साजरी केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी