Amit Shah in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये विकास होत आहे, आता तीन कुटुंबाची दादागिरी चालणार नाही - अमित शाह

जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री शाह यांनी जनसभेला संबोधित करताना म्हटलं की, जम्मू-काश्मीरमध्ये विकास सुरू झाला आहे.

Development is taking place in Jammu and Kashmir - Amit Shah
Amit Shah in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये विकास होत आहे  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • जम्मू-काश्मीरवाल्यांसह होत असलेला अन्याय संपण्याची वेळ आली आहे. आता तुमच्यावर कोणी अन्याय करू शकत नाही. - गृहमंत्री शाह
  • राज्यात 25 हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. आज आम्ही सात हजार लोकांना नोकरीसाठी नियुक्तीपत्रे दिली आहेत. - गृहमंत्री
  • आज जम्मू-काश्मीरमध्ये 12 हजार कोटींची गुंतवणूक होत आहे.

नवी दिल्ली :  केंद्रशासित प्रदेशाच्या निर्मितीनंतर प्रथमच जम्मूमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होत आहे. जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री शाह यांनी जनसभेला संबोधित करताना म्हटलं की, जम्मू-काश्मीरमध्ये विकास सुरू झाला आहे. जम्मू-काश्मीरवाल्यांसह होत असलेला अन्याय संपण्याची वेळ आली आहे. आता तुमच्यावर कोणी अन्याय करू शकत नाही. आता जम्मू-काश्मीरमध्ये विकास होईल आणि हे राज्य देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान देईल. 

सभेत बोलातना शाह म्हणाले की, 'प्रदेशातील 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदा मी येथे आलो आहे. येथे विकास सुरू झाला असून येथे समान रुपात विकास होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच ऑगस्ट रोजी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि 370  कलम हटवले.' 
पूर्वी प्रत्येकाला समान प्रकारच्या नोकऱ्या मिळत नसतं, पण आता तसे होणार नाही. राज्यातील आदिवासींना वन हक्क दिले. पूर्वी जम्मू -काश्मीरमध्ये चार वैद्यकीय महाविद्यालये होती पण आता सात नवीन महाविद्यालये बांधली जात आहेत. पाच पूर्ण झाले आहेत तर इतर दोनही लवकरच तयार होतील. आयआयटी कॅम्पस आजपासून सुरू झाला आहे.

यामध्ये सर्व आधुनिक सुविधा असतील. यामध्ये सर्व आधुनिक सुविधा असतील. यामध्ये 35 हजार युवक प्रशिक्षण घेऊ शकतील. राज्यात 25 हजार तरुणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. आज आम्ही सात हजार लोकांना नोकरीसाठी नियुक्तीपत्रे दिली आहेत. तर आज जम्मू-काश्मीरमध्ये 12 हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. जम्मू -काश्मीरमध्ये कोण गुंतवणूक करेल अशी तीन कुटुंबे आमची खिल्ली उडवत असत.आज जम्मू -काश्मीरमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली जात आहे. मागील सरकारांनी गेल्या 70 वर्षात काय दिले? मोदीजींनी 80 हजार कोटींचे पॅकेज दिले होते. राज्यातील एक हजार लोकांना वन हक्कांची कागदपत्रे देण्यात आली आहेत.

आज जम्मू -काश्मीरमध्ये 15 हजार विकासकामे सुरू झाली आहेत. आधीच्या सरकारांनी ते करण्यात कधीच रस दाखवला नाही, असं म्हणत अमित शाह यांनी मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस, आणि फारुख अब्दुल्ला यांच्यावर जोरदार टीका केली.   गृहमंत्री म्हणाले की, यापूर्वी जम्मूमध्ये शीख, खत्री, महाजन यांना जमीन खरेदी करण्याचा अधिकार नव्हता.तिथून येथे आलेल्या निर्वासितांना अधिकार नव्हते, वाल्मिकी, गुजर बांधवांना अधिकार नव्हते. आता माझ्या या बांधवांना भारतीय संविधानाचे सर्व अधिकार मिळणार आहेत.

अमित शहा म्हणाले की, एक काळ असा होता की जम्मू-काश्मीरमध्ये फक्त चार वैद्यकीय महाविद्यालये होती. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की जम्मू -काश्मीरमध्ये आता सात नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली आहेत. पूर्वी 500 विद्यार्थी येथून एमबीबीएस करू शकत होते, आता सुमारे 2,000 विद्यार्थी येथे एमबीबीएस करू शकतील. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, काल हे तीन कुटुंबीय मला प्रश्न विचारत होते की, तुम्ही काय देणार? भाऊ, मी काय देणार याचा हिशेब घेऊन आलो आहे. पण 70 वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये तीन घराण्यांनी राज्य केले, तुम्ही काय दिले याचा हिशेब घेऊन या. आज जम्मू-काश्मीर हिशेब मागत आहे, असे म्हणत शाहांनी फारुख अब्दुला आणि मेहबुबा मुफ्तींवर हल्लाबोल केला.


आता 3 कुटुंबांची दादागिरी येथे चालणार नाही: अमित शहा

आज जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येक गावात ग्रामपंचायत आहे, प्रत्येक तहसीलमध्ये एक तहसील पंचायत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा पंचायत आहे. आता 3 कुटुंबांची दादागिरी चालणार नाही. येथील पंच-सरपंच भविष्यात भारत सरकारमध्ये मंत्रीही होऊ शकतात, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होऊ शकतात.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी