Amarnath Yatra : अमरनाथ धाममध्ये पूजेला परवानगी देण्यात आली आहे. शुक्रवारी अमरनाथ गुहेजवळील ढगफुटीमुळे आलेल्या पुरामुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती, यामुळे भाविकांना भोलेनाथाचे दर्शन घेता आले नाही. मात्र आता भाविकांच्या तुकडीला जम्मू ते अमरनाथ यात्रेला सुरुवात करण्यात आली असून भाविक गुहेतील बाबा बर्फानीचे म्हणजे भोलेनाथचे दर्शन घेऊ शकतील. अमरनाथ मार्गावरील गर्दीमुळे येणारे अडथळे आज दूर करण्यात येणार असून, त्यानंतर यात्रा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. शुक्रवारी ढगफुटीमुळे आलेल्या पुरात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 40 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
जम्मूच्या उपायुक्त अवनी लवासा यांनी भाविकांना सांगितले आहे की, ज्यांनी 11 जुलै किंवा त्यापूर्वी स्वतःची नोंदणी केली आहे ते भगवती नवगार बेस कॅम्पवर येऊ शकतात. यापूर्वी, सरकारी सूत्रांनी सांगितले होते, की स्थानिक प्रशासन अमरनाथ यात्रा सोमवारी किंवा मंगळवारी पुन्हा सुरू करण्यास परवानगी देऊ शकते. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी रविवारी पहलगाम येथील बेस कॅम्पला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. येथे सिन्हा यांनी भाविकांशी संवाद साधला आणि तेथील लंगरसह व्यवस्थेचा आढावा घेतला.
Read Also : 'मी शाळेत जात आहे' हे इंग्रजीत बोलताना शिक्षकाला सुटला घाम
अमरनाथ धाम दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी लष्कराला उतरवण्यात आले. बचाव कार्यासाठी हवाई दल तैनात करण्यात आले होते. डीजीपी दिलबाग सिंग म्हणाले की, अनेक जखमींना आधीच रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. काही लोकांवर श्रीनगरच्या बेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांनाही 24 तासांत डिस्चार्ज दिला जाईल.
Read Also : JEE मुख्य निकाल घोषित, थेट 'या' लिंकवरून करा Download
मदत आणि बचाव कार्यात (एनडीआरएफ) गुंतलेल्या लोकांचे म्हणणे आहे की, बेपत्ता लोक जिवंत सापडण्याची शक्यता कमी होऊ लागली आहे. लोकांच्या शोधात ढिगारा हटवला जात आहे. मात्र, बचाव कर्मचारी चमत्कार होण्याची शक्यता नाकारत नाहीत. लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक आधुनिक उपकरणे वापरत आहे. दरम्यान, अमरनाथ यात्रा दोन वर्षांनंतर सुरू झाली आहे. कोरोना संकटामुळे ही पवित्र यात्रा दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आली होती. यात्रा सुरू झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.