Corona Virus third wave India: देशात खरंच कोरोनाची तिसरी लाट आली का? काय म्हणतात, कोविड टास्क फोर्सचे प्रमुख एनके अरोरा..

corona virus covid19 third wave in india update :राज्यासह देशात कोरोना (Corona) रुग्णांची (Patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रत्येक जण कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) आल्याचे म्हणत आहेत. तर काही जण ही तिसरी लाट नसल्याचं म्हणत आहेत.

NK Arora, head of the Covid Task Force
देशात खरंच कोरोनाची तिसरी लाट आली का?   |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरक्षित
  • मोठं-मोठ्या शहरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये 75 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत.

Corona Virus third wave India: नवी दिल्‍ली :  राज्यासह देशात कोरोना (Corona) रुग्णांची (Patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रत्येक जण कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) आल्याचे म्हणत आहेत. तर काही जण ही तिसरी लाट नसल्याचं म्हणत आहेत. ही संभ्रमावस्था निर्माण होण्याचं कारण म्हणजे देशावर संकट घोंघावत असताना देखील नागरिकांची बाजारात होणारी गर्दी. सामान्यांना कोरोनाचा धाक दाखवत जंगी वाढदिवस साजरी करणारी नेते मंडळी. कोणत्याच प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन या वाढदिवसांच्या पार्ट्यांमध्ये केलं जात नाही. यामुळे नागरिक तिसऱ्या लाटेविषयी संभ्रम आहेत. 

परंतु प्रत्येक दिवशी आढळणाऱ्या रुग्णांमुळे कोरोनाची ही तिसरी लाट असल्याचं सांगितलं जात आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख एनके अरोरा याविषयी म्हणतात की, मोठं-मोठ्या शहरातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये 75 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत.  यातून सहज जाणवतं की, कोरोनाची तिसरी लाट आल्याचे सिद्ध होते. 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोवॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. एन.के. अरोरा म्हणाले की, ओमायक्रॉन या अतिसंसर्गजन्य प्रकाराची बहुतांश प्रकरणे मुंबई, दिल्ली आणि कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये नोंदवली जात आहेत. देशातील ओमायक्रॉनची एकूण प्रकरणे 75 टक्के प्रकरणे ही मुंबई, कोलकातामध्ये आढळत आहेत. कोविड टास्क फोर्सचे प्रमुखांनी सांगितलं की, जीनोम सीक्वेंसिंगच्या हिशोबाने म्हटलं तर काही आठवड्यात राष्ट्रीय पातळीवर सर्व व्हेरिएंट 12 टक्के प्रकरणे ही ओमायक्रॉनची आढळत आहेत.परंतु गेल्या आठवड्यात हे प्रमाण 28 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. 

अरोरा पुढे म्हणाले की, Omicron हा कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा खूप वेगाने पसरत आहे. सर्वात महत्त्वाचे असले तरी दिल्ली, मुंबई, कोलकाता या महानगरांमध्ये त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. या महानगरांमध्ये Omicron ची 75 टक्के प्रकरणे आहेत. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की कोविड -19 ची तिसरी लाट देशात स्पष्टपणे आली आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता, Omicron वरचढ असून गेल्या चार-पाच दिवसांतील आकडेवारी या दिशेने निर्देश करतात.  कोविड टास्क फोर्सचे प्रमुख Dr NK Arora, Chairman of National Technical Advisory Group on Immunisation) म्हणाले की, देशात ओमायक्रॉनची 1700 प्रकरणे अधिकृतपणे नोंदवण्यात आली आहेत.

या प्रकाराची सर्वाधिक 510 प्रकरणे महाराष्ट्रात आढळून आली आहेत. एवढेच नाही तर देशात कोरोनाच्या बाबतीत 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  यासोबतच एनके अरोरा यांनी 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाबाबत उपस्थित होत असलेल्या चिंताही फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी