भारतातील कोरोना व्हायरस वेगळा, संशोधकांचा रिसर्चनंतर दावा

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 04, 2020 | 20:56 IST | नवभारत टाइम्स

हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बॉयोलॉजीच्या संशोधकांनी देशातील कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस असल्याचं म्हटलंय.संशोधकांच्या मते या वेगळ्या समुहाला ‘क्लेड ए३ आय’ नाव

CCMB corona Research
भारतात आढळला वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • भारतात आढळला वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस
  • हैदराबाद इथल्या CCMBच्या संशोधकांनी आपल्या रिसर्चमध्ये केला दावा
  • तेलंगाणा, तामिळनाडूच्या अधिकाधिक सँपलवर केली गेली तपासणी

नवी दिल्ली: भारतात कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी संध्याकाळपर्यंत देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या २ लाख १६ हजारांहून अधिक झालीय. यादरम्यान हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बॉयोलॉजीच्या संशोधकांनी देशातील कोरोना संक्रमित लोकांमधील एका वेगळ्या कोरोना व्हायरसचा (SARS-CoV2) शोध लावला आहे. संशोधकांनी दावा केलाय की, सध्या हा व्हायरस दक्षिणेतील राज्य तामिळनाडू आणि तेलंगाणामध्ये आढळला आहे.

तिथल्या संशोधकांनी व्हायरसच्या या वेगळ्या समूहाला ‘क्लेड ए3आय’ हे नाव दिलंय. हा नवीन व्हायरस भारतातील जेनेटिक सिक्वेंसच्या ४१ टक्के सँपलमध्ये आढळला आहे. संशोधकांनी ६४ जेनेटिकचा सिक्वेंस तयार केलाय. सीसीएमबीनं ट्वीट केलं, ‘भारतात SARS-CoV2 च्या प्रसरणानंतर जेनेटिक अॅनॅलिसिसवर एक नवीन रिसर्च समोर आलाय. रिसर्चनुसार, या व्हायरचा एक वेगळा समूह पण आहे, जो भारतात उपस्थित आहे. याला क्लेड ए३आय (CLADE-A3i) नाव दिलं गेलंय.’

तेलंगाणा आणि तामिळनाडूचे आहेत सँपल

सीसीएमबीनं पुढे सांगितलं, ‘असं म्हटलं जातं की, हा ग्रुप फेब्रुवारी २०२०मध्ये व्हायरसमुळे निर्माण झालाय आणि देशात पसरलाय. यात भारतातून घेतले गेलेले SARS-CoV2 जेनेटिकचे सर्व सँपलच्या ४१ टक्के आणि सार्वजनिक केले गेलेले वर्ल्ड जेनेटिकच्या साडे तीन टक्के आहे.’ सीसीएमबी संशोधक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद (सीएसआयआर) अंतर्गत येतं. सीसीएमबीचे डायरेक्टर आणि रिसर्च पेपरचे सह-लेखक राकेश मिश्रा यांनी सांगितलं की, तेलंगाणा आणि तामिळनाडू इथले हे अधिकाधिक सँपल क्लेड ए३आय सारखे आहेत. ते पुढे म्हणाले की, अधिकाधिक सँपल भारतात कोविड-१९ संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळातील आहेत.

फिलिपिंस आणि सिंगापूरशी मिळता-जुळता आहे हा टाईप

मिश्रा यांनी सांगितलं की, दिल्लीत सापडलेले अनेक सँपल याच्याशी मिळते-जुळते आहेत. मात्र महाराष्ट्र आणि गुजरातचे सँपल वेगळे आहेत. कोरोना व्हायरसचा हा टाईप सिंगापूर आणि फिलिपिन्सशी मिळता-जुळता आहे. त्यांनी सांगितलं की, आगामी काळात आणखी अधिक सँपलचं जेनेटिक सिक्वेंस तयार केलं जाईल, जेणेकरून याबाबतीत अधिक माहिती मिळण्यास मदत होईल. सोबतच भारतात SARS-CoV2 चे वेगळे आणि खूप जास्त प्रमाणात उपलब्ध समूहाचं वैशिष्ट्य सांगणारा हा पहिला रिसर्च आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी