Imran Khan No-Trust Vote: संसद बरखास्त करा, इमरान खान यांची राष्ट्रपतींना शिफारस, 90 दिवसात होऊ शकतात निवडणुका

किस्तानमध्ये (Pakistan) जबरदस्त राजकीय ड्रामा पाहण्यास मिळाला. संसदेतील (Parliament) इमरान खानच्या (Imran Khan) आश्चर्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये आता सार्वत्रिक निवडणुका (Elections) होणार आहेत. संसदेत अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात डॉ. संसद बरखास्त करण्याची शिफारस मी राष्ट्रपतींकडे केली आहे.

Imran Khan
पाकिस्तानात पुन्हा होणार पुन्हा एकदा सार्वजनिक निवडणुका?   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • नॅशनल असेंबलीचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी (kasim khan suri) यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावला.
  • राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केल्यास पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक निवडणुका होण्याची शक्यता
  • राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याची शिफारस

लाहोर:  पाकिस्तानमध्ये (Pakistan) जबरदस्त राजकीय ड्रामा पाहण्यास मिळाला. संसदेतील (Parliament) इमरान खानच्या (Imran Khan) आश्चर्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये आता सार्वत्रिक निवडणुका (Elections) होणार आहेत. संसदेत अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात डॉ. संसद बरखास्त करण्याची शिफारस मी राष्ट्रपतींकडे केली आहे, असे इमरान खान म्हणाले. अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इम्रान आता निवडणुकीपर्यंत हंगामी पंतप्रधान राहतील. दुसरीकडे, संसदेत विरोधक जोरदार निर्दशने करत आहेत. विरोधकांनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या विरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव नॅशनल असेंबलीचे डेप्युटी स्पीकर कासिम खान सूरी (kasim khan suri) यांनी फेटाळून लावला. विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव पाकिस्तानच्या संविधानाच्या आर्टिकल 5च्या विरोधात असून असंवैधानिक असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी स्पीकर असद कैसर यांच्या विरोधातही अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यामुळे सूरी यांनी कामकाज पाहिले. सूरी यांनी अविश्वास प्रस्ताव फेटाळल्यानंतर इमरान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे पाकिस्तानची संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केल्यास पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वत: इमरान खान यांनी वृत्तवाहिनीवरून देशाला संबोधित करताना ही माहिती दिली.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासाठी मोठा दिवस होता. इमरान खान सत्ता टिकवण्यात यशस्वी होतात की सत्तेतून पायउतार होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच पाकिस्तानातील विरोधी पक्षाने तर अविश्वास प्रस्ताव हरल्यानंतर इमरान खान यांना अटक होईल असं सांगून खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे पाकिस्तानातील राजकीय घडामोडीकडे आज संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.

समर्थकांची संसदेबाहेर घोषणाबाजी

पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीचं कामकाज उशिराने सुरुवात झालं. यावेळी सिक्रेट व्होटिंग ऐवजी ओपन व्होटिंग होणार असल्याचं सांगितलं जात होतं. कोणता खासदार कुणाच्या बाजूने मतदान करत आहे हे कळावं म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. कोणताही दगाफटका होणार नाही याची काळजी घेण्यासाठीही हा निर्णय घेण्यात आला होता. मतदानामुळे संसदेबाहेर इमरान खान यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर जमले होते. संसदेबाहेर घोषणाबाजीही सुरू होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी