Remarks On Prophet: प्रेषितप्रकरणी अरब देशांत पडसाद; नूपुर शर्मा आणि नवीन जिंदलवर कारवाईनंतरही वाद सुरुच, मुस्लिम संघटनांची अटकेची मागणी

प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबद्दल भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी अरब देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला़ त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर रविवारी भाजपला कारवाई करावी लागली़. भाजपने (BJP) नुपूर शर्माला (Nupur Sharma) निलंबित केले आहे, मात्र मुस्लिम संघटना (Muslim organizations) आता नुपूर शर्माच्या अटकेची मागणी करत आहेत.

Disputes continue even after action against Nupur Sharma and Naveen Jindal
प्रेषितप्रकरणी अरब देशांत पडसाद; नूपुर शर्मा आणि नवीन जिंदलवर कारवाई  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • ज्ञानवापी प्रकरणावरील वाद चर्चेत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं.
  • सपा खासदार एसटी हसन यांनी नुपूर आणि नवीन यांच्यावरील कारवाईबद्दल भाजपचे आभार मानले
  • भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी अरब देशांमध्ये निषेधाचा सूर

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याबद्दल भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी अरब देशांमध्ये निषेधाचा सूर उमटला़ त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर रविवारी भाजपला कारवाई करावी लागली़. भाजपने (BJP) नुपूर शर्माला (Nupur Sharma) निलंबित केले आहे, मात्र मुस्लिम संघटना (Muslim organizations) आता नुपूर शर्माच्या अटकेची मागणी करत आहेत. दुसरीकडे, यूपीचे मंत्री दयाशंकर सिंह यांच्या बहाण्याने अखिलेश यादव यांनी नुपूरवरील भाजपची कारवाई ही निव्वळ दिखाऊपणा असल्याचे म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वाद चर्चेत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. दिल्ली भाजपचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनीही प्रेषितांबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप असून, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली़ तर शर्मा यांनाही पक्षाने निलंबित केले आहे. या प्रकरणी इराण, कतार आणि कुवेत या देशांनी तेथील भारतीय दूतावासांना स्पष्टीकरणासाठी पाचारण केल़े  अरब देशांमध्ये ट्वीटरवर ‘‘भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाका’’, असा हॅशटॅग चालवण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. कतारने तेथील भारतीय राजदूतांना पाचारण करून नुपूर शर्मा यांच्या टिप्पणीबद्दल एका निवेदनाद्वारे तीव्र निषेध नोंदवला. 

कतारच्या परराष्ट् विभागाने रविवारी सांगितले की, भारतात भाजपनेत्यांकडून प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल विचारणा करण्यासाठी आम्ही भारताचे राजदूत दीपक मित्तल यांना पाचारण केले होते. या पूर्णत: अस्वीकारार्ह, निषेधार्ह विधानाबाबत आम्ही त्यांना निवेदन दिले आहे. धार्मिक व्यक्तीमत्त्वांबाबत भारतातील काही व्यक्ती अवमानकारक वक्तव्ये करीत असल्याबद्दल त्यांच्याकडे आम्ही चिंता व्यक्त केली आहे. यावर भारतीय राजदूतांनी स्पष्ट केले की, ही विधाने कोणत्याही प्रकारे भारत सरकारचे मत नाही, तर ती काही दुय्गम घटकांचे मत आहे. भारतीय परंपरेनुसार भारत सरकार सर्वच धर्मपंथांचा सन्मान करते. अशा विधानांबाबत संबंधितांवर कारवाईचे आश्वासनही त्यांनी दिले. भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू सध्या कतारच्या दौऱ्यावर आहेत.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर राजकीय हल्लाबोल

सपा खासदार एसटी हसन यांनी नुपूर आणि नवीन यांच्यावरील कारवाईबद्दल भाजपचे आभार मानले आहेत.  दुसरीकडे, काँग्रेस भाजपच्या या कारवाईला बाहेरच्या शक्तींच्या दबावाखाली उचललेले पाऊल असल्याचे सांगत आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून कतार, इराण आणि कुवेतने रविवारी भारतीय राजदूतांना बोलावले होते. आखाती देशांनी या टिप्पण्यांचा निषेध केला आणि आपला तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी