दोन विकृत तरुणांकडून कुत्र्यावर पाशवी बलात्कार, कुत्र्याचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

Dog Rape Case: उत्तरप्रदेशमध्ये एका कुत्र्यावर दोन जणांनी बलात्कार केल्यानंतर कुत्र्याचा मृत्यू झालाची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

दोन विकृत तरुणांकडून कुत्र्यावर पाशवी बलात्कार, कुत्र्याचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • दोन विकृत तरुणांकडून कुत्र्यावर पाशवी बलात्कार
  • कुत्र्याचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद
  • दोन्ही नराधम आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई: दिवसेंदिवस माणसामधील विकृतपणा वाढत चालला असल्याचं दिसून येत आहे. भयंकर किळसवाणा आणि विकृतपणाचा कळस असलेली आणखी एक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेशमधील एटा येथे एका कुत्र्यावरच बलात्कार करण्यात आला. ज्यामध्ये कुत्र्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, हे विकृत करणाऱ्या दोन नराधमांना पोलिसांनी अटक केली असल्याचीही माहिती समजते आहे. 

या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, 'उत्तरप्रदेशमधील एटा येथे ही विचित्र घटना घडली. ज्यामध्ये बलात्कार करण्यात आलेल्या कुत्र्याचा मृत्यू झाला.' दरम्यान, याप्रकरणी अशीही माहिती मिळाली की, दोन विकृत तरुणांनी आपल्याच घराच्या शेजारी राहणाऱ्या कुत्र्यावर पाशवी बलात्कार केला. ज्यामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हे अमानवी कृत्य करणाऱ्या दोघा आरोपींची नावं उमेश आणि नीरज अशी असल्याचं समजतं आहे. दरम्यान, याप्रकरणी कुत्राच्या मालकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

हा संपूर्ण विकृत प्रकार सीसीटीव्हीमुळे उजेडात आला आहे. कारण की, आरोपींच्या घराच्या शेजारीच राहणाऱ्या ंकुटुंबीयांनी आपल्या घराबाहेर सीसीटीव्ही बसवले आहेत. याच सीसीटीव्हीमुळे दोन्ही आरोपींचं भयंकर कृत्य समोर आलं. जेव्हा या कुत्र्याचे मालक आपल्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत होते त्यावेळी त्यांना आरोपी आपल्या घरातील कुत्र्यावर बलात्कार करत असल्याचं आढळून आलं. दोन्ही आरोपी कुत्र्यावर दररोज बलात्कार करत असल्याचंही उघड झालं आहे. या संपूर्ण प्रकारानंतर कुत्र्याच्या मालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच  नवी मुंबईतील खारघरमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका कुत्रीवर बलात्कार करून तिला ओरल सेक्ससाठी भाग पाडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. मुनमुन कुमार गुवोधन राम असे २० वर्षीय आरोपीचं नाव आहे. आरोपी एका फूड आऊटलेटमध्ये कामाला होता. हा प्रकार देखील एका मोबाइलमध्ये शूट करण्यात आला होता.  

तर त्याआधी अशीच एक घटना चेन्नईमध्ये समोर आली होती. गेल्या फेब्रुवारीत घडलेल्या या घटनेत एका चहा स्टॉलचा मालक भटक्या कुत्र्यांवर बलात्कार करत होता. दारूच्या नशेत तो हे कृत्य करत असल्याचे उघड झाले होते. त्याच्या विरूद्ध पुरावा न सापडल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी