Dog killed owner: पाळीव कुत्र्याने घेतला मालकाचा जीव, अशी चालवली गोळी

टर्कीमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेत पाळीव कुत्र्यानं अनावधानानं आपल्याच मालकाचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे.

Dog killed owner
पाळीव कुत्र्याने घेतला मालकाचा जीव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • कुत्र्याने गोळी चालवून घेतला मालकाचा जीव
  • मालकाच्या लोडेड शॉटगनवर मारली उडी
  • विचित्र घटनेत टर्कीच्या नागरिकाचा मृत्यू

Dog killed owner: पाळीव प्राण्यांच्या यादीत (Pet) कुत्र्याचे (Dog) नाव लोकप्रियतेच्या बाबतीत सर्वात अग्रस्थानी असते. मालकाशी इमान राखणारा आणि प्रसंगी आपल्या जिवाची बाजी लावून मालकाचे प्राण वाचवणारा अशी कुत्र्याची ख्याती असते. यापूर्वी अनेकदा मालक संकटात असताना आपल्या जीवावर खेळून कुत्र्यांनी त्यांचे प्राण वाचवल्याच्या घटना घडल्या आहेत. घरात कुत्रा असणे, हेदेखील अनेकांना सुरक्षित वाटण्याचे कारण असते. केवळ घरात कुत्रा आहे, या कारणाने अनेकदा चोर घराकडे फिरकत नाहीत. तर कुत्रा आणि मालक यांच्यात असणारं हे नातं सर्वश्रूत आहे. मात्र टर्कीमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेत पाळीव कुत्र्यानं अनावधानानं आपल्याच मालकाचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. 

अशी घडली घटना

टर्कीच्या सॅमसन भागात ही घटना घडली. टर्कीचे रहिवासी असणारे 32 वर्षांचे ओजगुर गेवरेकोग्लू यांना शिकारीची हौस होती. कामातून वेळ काढून ते अनेकदा शिकारीसाठी जंगलात जात. त्यांनी अनेक कुत्रे पाळले होते. वेगवेगळ्या घरात आणि कार्यालयात वेगवेगळे कुत्रे त्यांनी पाळले होते. त्यामुळे ते जिथे जातील, तिथे त्यांच्यासोबत कुठला ना कुठला कुत्रा असायचा. नेहमीप्रमाणे ते शिकारीसाठी जंगलात चालले असताना त्यांच्यासोबत एक कुत्रा होता. कुत्र्याला घेऊन ते शिकारीसाठी निघण्याचा तयारीत होते. तेवढ्यात हा अपघात झाला. 

अधिक वाचा - Vikram S Kirloskar Passes Away: 'टोयोटा'ला लोकप्रिय करणारे उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

चुकून चालली गोळी

आपल्या मित्रांसोबत आणि कुत्र्यासोबत शिकारीसाठी चाललेल्या ओजगुर आपली शॉटगन आपला कारबूटमध्ये ठेवण्याची तयारी केली होती. ही गन कारबूटमध्ये ठेवत असतानाच त्यांचा कुत्रा धावत त्यांच्या दिशेने आला. त्याने अचानक या गनवर उडी मारली. ही शॉटगन लोडेड होती. त्याच्या ट्रिगरवर कुत्र्याचा पाय पडल्याने गनमधून गोळी फायर झाली आणि ती गन ठेवण्यासाठी वाकलेल्या ओजगुर यांना लागली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुत्र्याने अचानक उडी मारल्याने त्यांना बचावाची संधीच मिळाली नाही. काही क्षणात ही गोळी त्यांच्या शरीरात घुसली आणि वर्मी घाव लागल्याने त्यांनी जागीच प्राण सोडल्याची माहिती त्यांच्या प्रत्यक्षदर्शी मित्रांनी दिली. 

बाळाचे वडील

काही दिवसांपूर्वी ओजगुर हे वडील झाले होते. त्यांना मुलगा झाला होता. मुलाच्या जन्माच्या आनंदात असतानाच अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

अधिक वाचा - Viral Video : रेल्वे कर्मचार्‍याची ही हातचलाखी पाहिली का ? पहा हा व्हायरल व्हिडीओ

पोलीस तपास सुरू

ही गोळी कुत्र्याच्या चुकीमुळे झाडली गेल्याचे सांगण्यात आले असले तरी पोलीस सर्व शक्यतांचा तपास करत आहेत. कदाचित कुणीतरी आजगुर यांचा खून केला असावा आणि कुत्र्याची कहाणी तयार केली असावी, असाही संशय व्यक्त केला जात आहे. लवकर या प्रकऱणाचे सर्व धागेदोर तपासून सत्य समोर आणलं जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. या घटनेमुळे टर्कीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी