Dogs Attack on youth:अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (Aligarh Muslim University)परिसरात रविवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कॅम्पसमध्ये (campus)लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यात थरकाप उडवणारी माहिती समोर आली. मृत तरुणावर तब्बल 10 ते 12 मोकाट कुत्र्यांनी हल्ला होता, त्यामुळे त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. कुत्र्यांनी चावा घेतल्याची ही संपूर्ण घटना AMUकॅम्पसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (A youth was attacked by 10 to 12 dogs; The youth died on the spot)
अधिक वाचा : लग्न करं असं का म्हणतात घरचे लोक; वाचा पालकांची कारणं
उत्तर प्रदेशच्या अलीगढ मुस्लिम विद्यापीठात फिरणाऱ्या तरुणावर कॅम्पसमध्ये 10 ते 12 भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या मृत तरुणाचे नाव सफदर अली आहे. विद्यापीठात या तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.
अधिक वाचा : या टीप्स करा फॅलो अन् कमी पैशात करा भटकंती
पोलिसांनी सांगितले की, सिव्हिल लाइनमध्ये राहणारा सफदर अली रविवारी सकाळी 7.30 वाजता एएमयू कॅम्पसमध्ये फेरफटका मारत होता. त्यानंतर 10 ते 12 कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. कुत्र्यांनी त्याच्या शरीरावर इतक्या ठिकाणी चावा घेतला की, सफदरचा काही वेळातच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी सफदर एकटाच होता. त्याला मदत करणारे आजूबाजूला कोणी नव्हते. काही वेळाने सफदरला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. त्यानंतर त्यांनी जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता सफदरचा मृत्यू कुत्र्यांनी घेतलेल्या चाव्यामुळे झाल्याचे उघड झाले. एसपी कुलदीप गुणवत यांनी सांगितले की, सध्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.