कोरोना काळात DOLO मेडिसीन डॉक्टर का लिहून द्यायचे?, इन्कम टॅक्सच्या छाप्यात उलगडले 1000 कोटींच्या गिफ्टचे रहस्य!

DOLO -650 fraud : ताप कमी करणाऱ्या डोलो-650 या औषधाचा बाजारात प्रचार करण्यासाठी त्याच्या निर्मात्याने अवलंबलेली युक्ती आता त्याच्या गळ्यातील ताईत बनत आहे. कंपनीबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

DOLO Medicine was writing a lot of doctors in Corona, 'Gift' secret of 1000 crores uncovered in Income Tax raid!
कोरोना काळात DOLO मेडिसीन डॉक्टर का लिहून द्यायचे?, इन्कम टॅक्सच्या छाप्यात उलगडले 1000 कोटींच्या गिफ्टचे रहस्य! ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आयकर पथकाने नऊ राज्यांमध्ये मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या 36 ठिकाणी छापे टाकले.
  • कोरोना महामारीच्या काळात या औषधाच्या विक्रीत मोठी वाढ झाली
  • कंपनीने 1,000 कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू वितरित केल्या

Dolo-650 tablet : डोलो-650 हे औषध, सामान्यतः तापावर उपचार करण्यासाठी वापरले जाते, प्रत्येक घरात उपलब्ध आहे. या औषधाची निर्मिती करणाऱ्या मायक्रो लॅब्सने कोरोनाच्या काळात यातून भरपूर नफा कमावला. पण, आता कंपनीने या औषधाची जाहिरात करण्याऐवजी डॉक्टरांना 1000 कोटींची मोफत भेट दिल्याचे समोर आले आहे. (DOLO Medicine was writing a lot of doctors in Corona, 'Gift' secret of 1000 crores uncovered in Income Tax raid!)

अधिक वाचा : Indian Railways Rules: ट्रेनमध्ये कोणताही प्रवासी यावेळी तुमच्या सीटवर बसू शकत नाही, टीटीदेखील तपासू शकत नाही तिकीट...पाहा नियम

आयकर विभागाने मुसक्या आवळल्या 

बिझनेस टुडेवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 6 जुलै रोजी आयकर पथकाने नऊ राज्यांमध्ये मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या 36 ठिकाणी छापे टाकले. सीबीडीटीने सांगितले की, कंपनीवर कारवाई केल्यानंतर विभागाने 1.20 कोटी रुपयांची अज्ञात रोख रक्कम आणि 1.40 कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

अधिक वाचा : Adani Vs Ambani: 5Gच्या मैदानात आमने-सामाने येणार अंबानी आणि अदानी, तेही 2 डॉलरसाठी, काय असणार टेलिकॉमचे भवितव्य?

जप्त केलेल्या कागदपत्रांमुळे मोठे रहस्य उघड 

यासंदर्भात कंपनीला ई-मेलद्वारे विचारणा केली असता, कोणतेही उत्तर मिळाले नाही. सीबीडीटीच्या म्हणण्यानुसार, आयकर छाप्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आणि डिजिटल डेटाच्या छाननीमध्ये कंपनीने 1,000 कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू वितरित करण्याचे रहस्य उघड केले आहे. निवेदनात म्हटले आहे की या कागदपत्रांवरून स्पष्टपणे दिसून येते की कंपनीने आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी चुकीचे डावपेच अवलंबले होते.

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 14 July 2022:मोठी संधी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, पाहा किती झाला भाव...

कोरोनाच्या काळात विक्रीचे रेकॉर्ड मोडले

या औषधाची किंमत कमी असेल, पण त्यातून कमाई करण्यासाठी कंपनीने जो खेळ केला, तो खेळ आज चर्चेचा विषय बनला आहे. कोरोना महामारीच्या काळात या औषधाच्या विक्रीत मोठी वाढ झाली होती. 2020 मध्ये, कोविड-19 ची प्रकरणे समोर आल्यानंतर, 350 कोटी गोळ्या विकल्या गेल्या आणि एका वर्षात कंपनीला सुमारे 400 कोटी रुपये मिळाले.

उपचारात परिणामकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

सीबीडीटीच्या निवेदनात या समूहाची ओळख उघड करण्यात आली नसली तरी, सूत्रांच्या हवाल्याने अहवालाने पुष्टी केली आहे की ती मायक्रो लॅब्स लिमिटेड आहे. CBDT नुसार, तपासादरम्यान आणखी अनेक आर्थिक अनियमितता आढळून आल्या आहेत. कोरोनाच्या काळात, हे वेदनशामक (वेदना कमी करणारे) आणि अँटीपायरेटिक (ताप कमी करणारे) औषध डोलो-650 उपचारांमध्ये डॉक्टरांनी सर्वात प्रभावी म्हणून वापरले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी