बेल्ट जंपसूटमध्ये भारतात पोहोचलेल्या मेलानिया ट्रम्प, जंपसूट आणि भारताचं हे आहे कनेक्शन

Donald Trump India Visit: डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि मुलगी इवांकासोबत भारतात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ट्रम्प कुटुंबियांची स्टाइल बघण्यासारखी होती. 

Donald Trump Family Style
बेल्ट जंपसूटमध्ये भारतात पोहोचलेल्या मेलानिया ट्रम्प, जंपसूट आणि भारताचं हे आहे कनेक्शन  |  फोटो सौजन्य: AP

मुंबईः  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरूवात अहमदाबादपासून केली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, इवांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनेर, अमेरिकेन मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत. ट्रम्प आपल्या कुटुंबियांसोबत एका वेगळ्याच स्टाइलमध्ये भारतात पोहोचले. विमानतळावर ट्रम्प, मेलानिया आणि इवांकाचा फर्स्ट लूक बघण्यासारथा होता. 

येथे डोनाल्ड ट्रम्प व्हाईट शर्टसोबत एका ब्लॅक कलरच्या सूटमध्ये दिसले. त्यांची येलो टायनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर मेलानिया यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास, Atelier Caito For Herve Pierre च्या व्हाईट जंपसूटमध्ये दिसल्या. 

मेलानिया यांच्या आउटफिटचं आहे भारतीय कनेक्शन 

मेलानिया यांनी या व्हाईट जंपसूटला मिड वेस्ट ग्रीन ब्लेडसोबत एक्सेसराइज केलं होतं. त्यांनी भारतीय संस्कृतीचा सन्मान म्हणून हा बेल्ट लावला होता. डिझाइनरनं सांगितलं की, या बेल्टची प्रेरणा 20 व्या शतकाच्या सुरूवातीच्या दरम्यान भारतीय फॅशनमुळे मिळाली.  याची आयडिया त्यांना भारतीय टेक्सटाइल डॉक्यूमेंटवरून आली होती. जी पॅरिसमध्ये एका जिल्हाधिकारीकडे मिळाली होती. हा बेल्ट हिरवा सिल्क आणि गोल्ड मॅटेलिक धागांनं बनवलेला आहे. 

तर ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प एका फ्लोरल ड्रेमसमध्ये दिसली. या कॉर्ल्ड ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. पीएम नरेंद्र मोदींनी स्वतःहून अमेरिकेचे राष्ट्राध्य आणि त्यांच्या कुटुंबियांचं स्वागत केलं. त्यानंतर ते साबरमती आश्रमात पोहोचले. पीएम मोदी यावेळी एका क्रिस्प व्हाईट कुर्ता पायजमासोबत ब्राऊन नेहरू जॅकेटमध्ये दिसले.

असा असेल डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा 

मंगळवारी, 25 फेब्रुवारी

  • 10:00 वाजताः अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत होईल.
  • सकाळी 10:30 वाजता: ट्रम्प महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाट येथील त्यांच्या समाधीस भेट देतील.
  • 11:00 वाजता: हैदराबाद हाऊस येथे ट्रम्प आणि मोदी यांच्यात प्रतिनिधीमंडळ पातळीवर चर्चा होईल.
  • 12:40 वाजता: कराराची देवाणघेवाण / सामायिक प्रेस स्टेटमेंट जारी केले जाईल.
  • संध्याकाळी 7:30 वाजता : राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत बैठक होईल.
  • रात्री 10:00 वाजता: ट्रम्प अमेरिकेला रवाना होतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...