हाऊडी मोदी कार्यक्रमावर सर्व जगाच्या नजरा, ट्रम्प करू शकतात मोठी घोषणा 

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 20, 2019 | 17:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

२२ सप्टेंबरला टेक्सासच्या ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील होणार आहे. यात जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष या व्यासपीठावर असणार आहेत. 

donald trump indicates of big announcement in howdy modi international news in marathi
हाऊडी मोदी कार्यक्रमात ट्रम करू शकतात मोठी घोषणा 

थोडं पण कामाचं

  • २२ सप्टेंबरला ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम 
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही असणार व्यासपीठावर 
  • सुमारे ५० हजार लोकांना संबोधित करणार पंतप्रधान मोदी 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत की, रविवारी ह्युस्टनमध्ये होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमात एक मोठी घोषणा करू शकतात. या कार्यक्रमात ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सुमारे ५० हजार भारतीय अमेरिकी नागरिकांना संबोधित करणार आहेत. व्हाइट हाऊसने दोन्ही देशांच्या विशेष नेत्याला रेखांकित करत सोमवारी घोषणा केली होती की ट्रम्प २२ सप्टेंबर रोजी मोदींसोबत ह्युस्टन येथील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

पहिल्यांना असे होणार आहे, की ट्रम्प आणि मोदी एका व्यासपीठावर असणार आहेत. या दोन्ही नेत्यांची तीन महिन्यात ही तिसरी बैठक असणार आहे. यापूर्वी त्यांनी जूनमध्ये जपानमध्ये जी-२० शिखर संमेलन आणि गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये जी-७ शिखर संमेलनात एकमेकांची भेट घेतली होती. ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीवरून कॅलिफोर्नियाला जाताना एअरफोर्स वन विमानात बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  नव्या घोषणा होऊ शकतात, पंतप्रधान नरेंद्र मोदीशी माझे चांगले संबंध आहेत. पण याबाबत त्यांनी सविस्तर बोलायचे टाळले. 

ट्रम्प यांना विचारण्यात आले की ते व्ह्यूस्टन रॅलीमध्ये एखादी नवी घोषणा करणार का, त्यावर उत्तर देताना ट्र्म्प यांनी होऊ शकते असे उत्तर दिले. मीडिया रिपोर्टनुसार दोन्ही देशातील अधिकारी ह्युस्टनमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीपूर्वी एक व्यापारी कराराला अंतीम रूप देण्याचा प्रयत्न करणार आहे. ट्रम्प यांनी तक्रार केली होती की भारताकडून अमेरिकन उत्पादनावर लावण्यात येणारे आयात शुल्क आता स्वाकार्य नाही आहे. त्यानंतर दोन्ही देशात व्यापारिक तणावाची परस्थिती वाढली होती. 

अमेरिकेने जूनमध्ये व्यापारात सामान्य व्यवस्थेनुसार भारताचा लाभार्थी विकसनशील देशाचा दर्जा संपविला होता. त्याला प्रत्युत्तर देत भारताने अमेरिकेच्या २८ उत्पादनांवर पाच जूनपासून कर लादला होता. यात बदाम आणि सफरचंदाचा समावेश होता. ह्युस्टनच्या कार्यक्रमात भारतीय अमेरिकन नागरिकांना विक्रम संख्येत नोंदणी केल्याबाबत ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांच्या कार्यक्रमात सामील होण्याच्या घोषणेनंतर या कार्यक्रमाची गर्दी वाढली आहे. या कार्यक्रमासाठी ५० हजार भारतीय-अमेरिकन नागरिकांना नोंदणी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी