काश्मीरवरील मध्यस्थेचा प्रश्नच नाही, डोनाल्ड ट्रम्प यांनी मारली कोलांटउडी 

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 13, 2019 | 13:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

कश्मीरबाबत पाकिस्तानने अमेरिकेकडे मदतीची मागणी केली आहे. पण या प्रकरणी मध्यस्थेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा कोलांटउडी घेतली आहे. 

donald trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • डोनाल्ड ट्रम्प गेल्या महिन्यात दावा केला होता की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थता करण्याची विनंती केली होती. 
  • नंतर त्यांनी म्हटले की भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांना मान्य असेल तर ते मध्यस्थता करण्यास तयार आहे
  • आता अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी काश्मीरवर भारत सरकारची भूमिका स्पष्ट केली 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात आपल्या वक्तव्याने भारतीय राजकारण तापवले होते. त्यांनी म्हटले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी आपल्याला काश्मीर प्रश्नी मध्यस्थता करण्याची मागणी केली होती. भारताने या गोष्टीचा साफ शब्दांत इन्कार केला होता.  तसेच स्पष्ट केले होते की, काश्मीर प्रकरणी कोणत्याही तिसऱ्या देशाशी चर्चा करण्याचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट सांगितले होते की, जर बोलायचे असेल तर आम्ही फक्त पाकिस्तानशी बोलू, कोणत्याही तिसऱ्या देशाशी बोलणार नाही.  अमेरिकेच्या या भूमिकेमुळे आता पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

भारताच्या स्पष्ट भूमिकेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वतःच्या त्या वक्तव्यावरून कोलांटउडी घेतली आहे.  त्यांनी म्हटले की काश्मीरवर मध्यस्थता करण्यास तयार आहोत, जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना मान्य असेल तेव्हाच. दरम्यान भारताने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की काश्मीर प्रकरणी कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज नाही. त्यामुळे आता ट्र्म्प यांनी अशा प्रकारे मध्यस्थता करण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, असे आता म्हटले आहे. भारताच्या भूमिकेचा अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनीही पुनर्रुच्चार केला आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, काश्मीरबाबत मध्यस्थतेचे सारखी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नाही किंवा त्यांची गरज आहे. 

श्रृंगला यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की जम्मू काश्मीर प्रकरणी त्यांची मध्यस्थता प्रस्ताव भारत आणि पाकिस्तान यां दोन्ही देशांच्या एकमतावर अवलंबून आहे. भारताने मध्यस्थता करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे अशा प्रकारे मध्यस्थता करण्याचे औचित्य राहत नाही. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी काश्मीर प्रकरणी मध्यस्थता करण्याची विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर पाकिस्तानने यावर आनंद व्यक्त केला आणि भारताने याला वक्तव्याचा स्पष्ट शब्दात इन्कार दिला होता. 

काश्मीरबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तान या प्रकरणाला प्राधान्य देत पुन्हा या प्रकरणी ट्रम्प यांच्याकडे मध्यस्थता करण्याची विनंती केली आहे. पण भारताने स्पष्ट केले की काश्मीर हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे काश्मीर बाबत कलम ३७० रद्द करण्याचा आणि जम्मू आणि काश्मीर  तसेच लडाख  यांना दोन केंद्र शासित प्रदेश बनविण्याचा निर्णय हा संविधानातील तरतूदीनुसार घेण्यात आला आहे. 

काश्मीर प्रश्न हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे त्यात कोणताही प्रकारचा हस्तक्षेप करण्यात येणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...