Donald Trump यांची पहिली पत्नी Ivana यांचे 73 व्या वर्षी निधन, मुलगी इव्हांकाची Emotional Post

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प (Ivana Trump) यांचं निधन झालं आहे.

Ivana trump
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांचं निधन  |  फोटो सौजन्य: AP
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे न्यूयॉर्क शहरात निधन झालं.
  • इव्हाना यांच्या निधनामुळे ट्रम्प कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
  • ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इव्हाना यांना श्रद्धांजली वाहिली.

 न्यूयॉर्क: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष (Former US President)  डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांची पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प (Ivana Trump) यांचं निधन झालं आहे.  न्यूयॉर्कमध्ये वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. इव्हाना ट्रम्प यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कुटुंबियांकडून मृत्यूचं कारणं अद्याप सांगितलेलं नाही. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, इव्हाना यांचे न्यूयॉर्क शहराच्या अप्पर ईस्ट बाजूला त्यांच्या घरी निधन झाले. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गुरुवारी दुपारी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवर माजी पत्नीच्या मृत्यूची बातमी शेअर केली.

अधिक वाचा-  आज राज्यात अशी असेल पावसाची स्थिती, कोणत्या जिल्ह्यात कोणता Alert; हे आहेत लेटेस्ट अपडेट्स

ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इव्हाना यांना श्रद्धांजली वाहिली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, इव्हाना ट्रम्प एक अद्भुत आणि सुंदर महिला होती. जी एक उत्कृष्ट आणि प्रेरणादायी जीवन जगली. इव्हाना यांच्या निधनामुळे ट्रम्प कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

आईच्या निधनावर मुलगी इवांका ट्रम्पने भावनिक पोस्ट लिहिली आणि म्हणाली, आईच्या निधनाने माझे मन दु:खी झाले आहे. आई हुशार, मोहक, तापट आणि विनोदी होती. तिनं आयुष्य भरभरून जगले - हसण्याची आणि नाचण्याची संधी कधीही सोडली नाही. मी तिची नेहमी आठवण ठेवीन आणि तिची आठवण माझ्या हृदयात कायम ठेवेन.

कुटुंबियांची आली प्रतिक्रिया 

इव्हाना ट्रम्प या डोनाल्ड जूनियर, इवांका आणि एरिक ट्रम्प यांची आई आहे. आईच्या निधनावर एरिक ट्रम्प म्हणाले, आमची आई एक अतुलनीय महिला होती. व्यवसायात त्यांची एक वेगळीच ओळख होती. एक जागतिक दर्जाची खेळाडू, एक सुंदर स्त्री आणि काळजी घेणारी आई आणि मैत्रीणीचं आज निधन झालं. 

1977 मध्ये झालं होतं लग्न 

चेकोस्लोव्हाकियामधील कम्युनिस्ट राजवटीत वाढलेल्या मॉडेल इव्हाना ट्रम्पने 1977 मध्ये डोनाल्ड ट्रम्पशी लग्न केलं. जे त्यावेळी ट्रम्प रिअल इस्टेट डेव्हलपर व्यवसायात नवीनच होते. त्यांचं पहिलं बाळ डोनाल्ड जूनियर त्याच वर्षी जन्माला आले. इव्हांकाचा जन्म 1981 मध्ये झाला आणि एरिकचा जन्म 1984 मध्ये झाला.

अधिक वाचा-  आज राज्यातल्या राजकारणात घडणार मोठी घडामोड, 'या' दोन नेत्यांची होणार भेट; राजकीय चर्चांना उधाण

ट्रम्प यांची तीन आणि इव्हाना यांनी केली होती चार लग्न

80 च्या दशकात, ट्रम्प हे न्यूयॉर्कमधील सर्वात उच्च-प्रोफाइल जोडप्यांपैकी एक होते. डोनाल्ड ट्रम्प आणि इव्हाना ट्रम्प यांनी 90 च्या दशकाच्या सुरुवातीला घटस्फोट घेतला आणि 1993 मध्ये अभिनेत्री मॅपल्सशी लग्न केले. डोनाल्ड ट्रम्प यांचे मॅपल्ससोबतचे संबंध 1999 पर्यंत टिकले. 2005 मध्ये त्यांनी तिसरे आणि सध्याची पत्नी मेलानिया ट्रम्पशी लग्न केले. त्याच वेळी, इव्हाना ट्रम्पने तिच्या आयुष्यात चार वेळा लग्न केले होते. डोनाल्ड ट्रम्पशी लग्न करण्यापूर्वीही त्यांनी एकदा लग्न केले होतं आणि त्यानंतर दोनदा लग्न केलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी