डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्याच्या काही तासांसाठीचा खर्च तब्बल इतक्या कोटींच्या घरात

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 15, 2020 | 13:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

२४ फेब्रुवारी रोजी ट्रम्प गुजरात दौऱ्यावर येतील अशी माहिती आहे. ट्रम्प यांच्या स्वागत आणि आदर सत्कारासाठी गुजरात सरकार जोमात तयारी करत आहे.

Donald Trump's three hour visit to India costs around 100 crore
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्याच्या काही तासांसाठीचा खर्च कोटीच्या घरात  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्याची सध्या चांगलीच चर्चा आहे.
  • २४ फेब्रुवारी रोजी ट्रम्प गुजरात दौऱ्यावर येतील अशी माहिती आहे.
  • गुजरात राज्य सरकार ट्रम्प यांच्या स्वागतासाठी तब्बल १०० करोडच्या आसपास खर्च करत असल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते गुजरात दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या या हायप्रोफाइल दौऱ्यावर होणार खर्च तुम्ही ऐकलात तर तुम्हाला चांगलाच धक्का बसेल. २४ फेब्रुवारी रोजी ट्रम्प गुजरात दौऱ्यावर येतील अशी माहिती आहे. ट्रम्प यांच्या स्वागत आणि आदर सत्कारासाठी गुजरात सरकार जोमात तयारी करत आहे.

रिपोर्टनुसार, २४ फेब्रुवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प तीन तासाच्या दौऱ्यादरम्यान अहमदाबाद इथेही जाणार आहेत. गुजरात राज्य सरकार ट्रम्प यांच्या स्वागतासाठी तब्बल १०० करोडच्या आसपास खर्च करत असल्याची माहिती आहे. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या या दौऱ्याची जय्यत तयारी गुजरातमध्ये सुरू आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. “ट्रम्प यांच्या या दौऱ्यात बजेटमुळे कुठेही अडथळा आला नाही पाहिजे”, असे त्यांनी म्हटले आहे. अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी राज्यातील रस्ते आणि सुशोभिकरणाच्या कामात लागले आहेत. यासाठी एकूण १०० करोडपेक्षाही जास्त खर्च येत आहे.

रस्ते दुरूस्ती आणि सुशोभिकरणासाठी ६० करोड

१७ रस्त्यांची दुरूस्ती आणि १.५ किमीच्या रस्त्याची दुरूस्ती आणि सुशोभिकरण यासाठी ६० करोड रूपयांचे बजेट आहे. हा तोच १.५ किमीचा रस्ता आहे, ज्यावरून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प एअरपोर्टवरून थेट मोटेरा स्टेडियममध्ये जाणार आहेत. या रस्त्यासाठी खासकरून वेगळे ६ करोड रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. डेव्हलपमेंट अथॉरिटी रस्त्यांसाठी एकूण २० करोड रूपयांचा खर्च करत आहे.

या संपूर्ण बजेटमध्ये केंद्र सरकारदेखील खर्च करत आहे, मात्र सर्वात मोठा वाटा हा गुजरात राज्य सरकारचा आहे. एकूण या दौऱ्यासाठी होणारा खर्च पाहिला तर तो १०० करोड रूपयांपेक्षाही जास्त दिसत आहे. कोणत्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये यासाठी सर्व विभागांना सर्व प्रकारची लॉजिस्टिक आणि प्रशासकीय कामं उरकून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील रस्त्यांच्या भरीवकामासाठी एकूण ५०० करोडचे बजेट जाहीर केले आहे. यामध्ये महत्त्वाच्या म्हणजे मोटेरा स्टेडियम, एअरपोर्ट आणि साबरमती आश्रमानजिकच्या परिसरातील रस्त्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी