Crime News: हादरली राजधानी दिल्ली, घरात घुसून डबल मर्डर; सासू- सुनेवर चाकूनं वार

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 16, 2022 | 10:44 IST

Delhi Crime News: देशाची राजधानी दिल्ली (Delhi) डबल मर्डरच्या (double murder) घटनेनं हादरली आहे. दिल्लीत दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे.

delhi crime news double murder
दिल्लीत डबर मर्डर  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • देशाची राजधानी दिल्ली (Delhi) डबल मर्डरच्या (double murder) घटनेनं हादरली आहे.
  • मारेकऱ्यांनी घरात घुसून सासू (mother-in-law) आणि सुनेची (daughter-in-law) हत्या केली.
  • घटनेच्या वेळी घरात फक्त दोघीच उपस्थित होत्या.

नवी दिल्ली: Double Murder in Delhi:  देशाची राजधानी दिल्ली (Delhi)  डबल मर्डरच्या  (double murder) घटनेनं हादरली आहे. दिल्लीत दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. मारेकऱ्यांनी घरात घुसून सासू (mother-in-law)  आणि सुनेची (daughter-in-law) हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. दोघांची हत्या केल्यानंतर चोरट्यांनी घरात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कमही पळवून नेली. घटनेच्या वेळी घरात फक्त दोघीच उपस्थित होत्या. मारेकर्‍यांनी घरात असलेल्या पाळीव कुत्र्याला बांधून ठेवलं होतं, अशी माहिती ही पोलिसांनी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, डॉली रॉय आणि त्यांची सासू विमला देवी घरात एकट्या होत्या. डॉलीची दोन्ही मुले दिल्लीबाहेर गेली होती. मंगळवारी सकाळी ते परत आले असता कोणीही दरवाजा उघडत नव्हतं. त्यानंतर दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता घरात आई आणि आजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. घरातून दागिने आणि रोख रक्कमही चोरीला गेली आहे. घरातील पाळीव कुत्र्यालाही चोरट्यांनी बांधून ठेवलं होतं.

अधिक वाचा- Belly Fat कमी करायचं आहे?, मग 'या'पाच सोप्या Tips करून बघाच

पोलिसांकडून तपास सुरू 

पोलिसांना संशय आहे की, चोरट्यांनी घरात फ्रेंडली एन्ट्री केली. यानंतर सासू आणि सुनेची चाकूनं वार करून हत्या करण्यात आली. सध्या पोलीस सीसीटीव्ही स्कॅन करत आहेत, जेणेकरून मारेकऱ्यांचा सुगावा लागू शकेल.

Delhi Double murder

मालवीय नगरमध्ये विद्यार्थ्याची हत्या

त्याचवेळी दिल्लीतील मालवीय नगरमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील हत्येची ही भीषण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट रोजी दिल्लीत हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाची 4-5 जणांनी निर्घृणपणे भोसकून हत्या केली. ही घटना दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागातील आहे. येथे एका 25 वर्षीय तरुणाची रस्त्याच्या मधोमध हत्या करण्यात आली. 

हत्या सीसीटीव्हीत कैद

मयंक असे मृत तरूणाच नाव असून त्याचे वय 25 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलं होतं. या घटनेचे फुटेज सीसीटीव्हीत कैद झाले आहे. गर्दीच्या बाजारपेठेत 4 ते 5 जणांनी मयंकला घेरून धक्काबुक्की केल्याचे सीसीटीव्हीत समोर आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी