Dowry: हुंड्यात बाईक मिळाली नाही म्हणून, पत्नीला मारहाण; दुदैवी मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 11, 2019 | 21:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dowry: राज्यस्थान, हरियाणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये हुंडाबळींची संख्या लक्षणीयरित्या जास्त आहे. छत्तीसगड राज्यात हुंड्यात बाईक मिळाली नाही म्हणून पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Dowry Killings
हुंड्यासाठी मारहाणीत पत्नीचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • देशांत हुंडाबळींची संख्या आजही लक्षणीय
  • प्रबोधनचे प्रयत्न पडतायत कमी
  • बाईकसाठी पत्नीला जबर मारहाण

रायपूर : आपल्या देशात आजून किती वर्षे महिला हुंड्याच्या बळी ठरणार आहेत कोण जाणे. शहरांत विशेषतः महानगरांमध्ये हुंडा प्रथेला थोडाफार लगाम लागल्याचं दिसत आहे. पण, ग्रामीण भागात मात्र ही प्रथा अजूनही चालूच आहे. त्यातच राज्यस्थान, हरियाणा, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये हुंडाबळींची संख्या लक्षणीयरित्या जास्त आहे. असा एका हुंड्यातील क्षुल्लक गोष्टीमुळे एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागला आहे. छत्तीसगड राज्यात केवळ हुंड्यात बाईक मिळाली नाही म्हणून एकाने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित पतीनं पत्नीला इतकं मारले की, त्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. कहर म्हणजे आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने मृत पत्नीच्या शरीरावर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. पण, मृत महिलेच्या शवविच्छेदनात तिचा मृत्यू जळाल्यानं नाही तर, मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले.

आगीत मृत्यू झाल्याचा बनाव

घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यातील बोंदरा गावात ८ जून रोजी एका महिलेचा आगीत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पोलिसांनी तशी नोंद करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेला. पण, शवविच्छेदनात धक्कादायक बाब समोर आली. त्यात संबंधित महिलेचा मृत्यू मारहाणीत झाल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या दिशेने तपास करून संशयित आरोपी असलेल्या तिच्या पतीला ताब्यात घेतले. चौकशीत पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर पतीने आपला गुन्हा कबूल केला. हुंड्यामध्ये पतीनं सासरच्या मंडळींकडे बाइकची मागणी केली होती. पण, सासरच्या मंडळींना तो हट्ट पुरवणे शक्य नव्हते. यावरून संबंधित पती पत्नीला सतत मारहाण करायचा. ८ जूनला पत्नीला याच कारणावरून मारहाण करत असताना, तिचा मृत्यू झाला. त्यानंतर खुनाचा आरोप होऊ नये म्हणून संबंधित पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यात घरात आगीत पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव त्याने केला होता. पण, शवविच्छेदन अहवालामुळे पतीच बिंग फुटलं आणि पोलिसांनी त्याला अटक केली. संबंधित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

हरियाणातही हुंड्यासाठी मारहाण

हरियाणातील फरीदाबादमध्येही हुंड्यासाठी मारहाण केल्याची अशीच एक घटना घडली होती. त्यात पतीने आई वडील आणि भावाच्या मदतीने पत्नीला प्रचंड मारहाण केली होती. पतीने हुंडा मागितल्यानंतर पत्नीनेच हुंडा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिला मारहाण करण्यात आली. या दाम्पत्याचं नवीनच लग्न झाले होते. सुरूवातीला त्या तरूणाने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेतलं होतं. त्यानंतर लग्न केलं आणि हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरूवात केली होती. हुंड्याची प्रथा बंद होण्यासाठी प्रबोधन करण्यात येत असले तरी, सातत्याने हुंडाबळीच्या किंवा मारहाणीच्या घटना समोर येतच आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Dowry: हुंड्यात बाईक मिळाली नाही म्हणून, पत्नीला मारहाण; दुदैवी मृत्यू Description: Dowry: राज्यस्थान, हरियाणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये हुंडाबळींची संख्या लक्षणीयरित्या जास्त आहे. छत्तीसगड राज्यात हुंड्यात बाईक मिळाली नाही म्हणून पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles