Philanthropy work : नव्या युगाचे दानशूर कर्ण...असाही आगळावेगळा माणूस, ज्याने आयुष्यभराच्या 600 कोटींच्या कमाईचे केले दान...

Philanthropy work : दानवीर कर्ण आजही जगातील सर्वात मोठा दानशूर व्यक्ती मानला जातो. आजही आपल्याकडे कोणी खूपच मोठे दान केले तर त्याला कर्णाची उपमा दिली जाते. आपण अशाच एका दानशूर व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. असा परोपकारी व्यक्ती ज्याने आयुष्यभराची कमाई सेवाभावी कामासाठी (Social Work) दान केली. या व्यक्तीने हसत हसत 600 कोटी रुपयांचे दान केले आहे. ही व्यक्ती आहे मुरादाबादचे उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल (Dr. Arvind Kumar Goyal)हे आहेत. डॉ. गोयल यांनी आपली संपूर्ण संपत्ती गरिबांसाठी दान केली आहे.

Dr. Arvind Kumar Goyal's philanthropy work
डॉ. अरविंद कुमार गोयल यांचा अफाट दानशूरपणा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मुरादाबादचे उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी आय़ुष्यभराची कमाई दान केली
  • आयुष्यभर कमावलेल्या तब्बल 600 कोटी रुपयांचे केले दान
  • देशभरात शेकडो वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि मोफत आरोग्य केंद्रे चालवणारा अफाट माणूस

Dr. Arvind Kumar Goyal : नवी दिल्ली : दानवीर कर्ण आजही जगातील सर्वात मोठा दानशूर व्यक्ती मानला जातो. आजही आपल्याकडे कोणी खूपच मोठे दान केले तर त्याला कर्णाची उपमा दिली जाते. आपण अशाच एका दानशूर व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत. असा परोपकारी व्यक्ती ज्याने आयुष्यभराची कमाई सेवाभावी कामासाठी (Social Work) दान केली. या व्यक्तीने हसत हसत 600 कोटी रुपयांचे दान केले आहे. ही व्यक्ती आहे मुरादाबादचे उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल (Dr. Arvind Kumar Goyal)हे आहेत. डॉ. गोयल यांनी आपली संपूर्ण संपत्ती गरिबांसाठी दान केली आहे. डॉ. गोयल यांच्या दान केलेल्या (Donation of Rs 600) मालमत्तेची किंमत सुमारे 600 कोटी रुपये आहे. या माणसाने आयुष्यभर कष्ट करून शेकडो कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले आणि ते एका क्षणात दान केले. असे उदाहरण फारच दुर्मिळ आहे. डॉ. गोयल यांनी आपली कमाई गरीब आणि अनाथ मुलांच्या शिक्षण आणि वैद्यकीय उपचारासाठी राज्य सरकारला देण्याची घोषणा केली आहे. (Dr. Arvind Kumar Goyal donated Rs 600 for philanthropy work)

मुरादाबादच्या सिव्हिल लाईन्समध्ये डॉक्टर अरविंद कुमार गोयल यांचा बंगला आहे. केवळ हा बंगला डॉ. गोयल यांनी त्यांच्याकडे ठेवला आहे. सोमवारी रात्री त्यांनी सर्व काही दान करण्याची घोषणा करताच, संपूर्ण शहरात त्यांच्याच नावाची चर्चा सुरू झाली. मंगळवारी सकाळपासूनच त्यांच्या बंगल्यावर लोकांची गर्दी होऊ लागली.

अधिक वाचा : BIG BREAKING: एनएसई फोन टॅपिंग प्रकरण, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

निर्णयात पत्नी आणि मुलांचा पाठिंबा

डॉ. अरविंद कुमार गोयल यांच्या पश्चात त्यांची पत्नी रेणू गोयल याशिवाय त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा मधुर गोयल मुंबईत राहतो. लहान मुलगा शुभम प्रकाश गोयल मुरादाबाद येथे राहतो आणि वडिलांना समाजसेवा आणि व्यवसायात मदत करतो.

या घटनेने माझे आयुष्य बदलले

संपत्ती दान करण्याच्या निर्णयाबाबत डॉ. गोयल म्हणाले की, त्यांनी आपली सर्व संपत्ती 25 वर्षांपूर्वीच दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळच्या एका घटनेचा संदर्भ देत डॉ. गोयल म्हणाले की, डिसेंबर महिना होता आणि ते ट्रेनने कुठेतरी जात होते. त्यांच्या समोर एक माणूस थंडीने थरथरत होता. त्याच्या पायात घोंगडी किंवा चप्पल नव्हती. डॉ. गोयल म्हणाले की, मी त्यांना माझे शूज दिले पण थंडीमुळे माझ्याकडून राहवले गेले नाही. मला ती थंडी सहन होत नव्हती.

डॉ. गोयल म्हणतात 'त्या रात्री मला वाटले की किती लोक थंडी वाजवत असतील. तेव्हापासून मी गरीब आणि निराधार लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करू लागलो. मी खूप प्रगती केली आहे पण जीवनात भरवसा नाही. त्यामुळे मी जिवंत असताना माझी मालमत्ता योग्य हातात सोपवत आहे. जेणेकरून काही गरजूंना त्याचा उपयोग होईल. माझी मालमत्ता दान करण्यासाठी मी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले आहे.

अधिक वाचा : उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिले 50 लाखांचे टार्गेट

डॉ.गोयल हे क्रांतिकारी पालकांचे पुत्र 

डॉ गोयल यांचे वडील प्रमोद कुमार गोयल आणि आई शकुंतला देवी स्वातंत्र्यसैनिक होते. एवढेच नाही तर त्यांचे मेहुणे मुख्य निवडणूक आयुक्त होते. डॉ गोयल यांचे जावई कर्नल आणि सासरे लष्करात न्यायाधीश आहेत.

चार राष्ट्रपतींनी केला आहे सन्मान

डॉ. गोयल यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रपती राम नाथ कोविंद, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी राष्ट्रपती प्रतिभा देवी पाटील आणि माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी सन्मानित केले आहे.

अधिक वाचा - मोठी बातमी ! शिवसेना NDAतून कधी बाहेर पडलीच नाही, सेना खासदाराचा गौप्यस्फोट

प्रचंड मोठे सामाजिक कार्य

डॉ.गोयल हे समाजसेवेच्या कार्यासाठी आधीच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मदतीने गेली 20 वर्षे देशभरात शेकडो वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि मोफत आरोग्य केंद्रे चालवली जात आहेत. याशिवाय त्यांच्या मदतीने सुरू असलेल्या शाळांमध्ये गरीब मुलांना मोफत शिक्षणही दिले जात आहे. कोविड लॉकडाऊनमध्येही त्यांनी जवळपास 50 गावे दत्तक घेऊन लोकांना मोफत अन्न आणि औषध दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी