Long Range Bomb अग्नी ५ नंतर लाँग रेंज बॉम्बची यशस्वी चाचणी

DRDO, IAF successfully flight tests indigenous Long Range Bomb अग्नी ५ या पाच हजार किमी. पल्ला असलेल्या आंतरखंडीय अण्वस्त्रवाहक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर भारताने लाँग रेंज बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली.

DRDO, IAF successfully flight tests indigenous Long Range Bomb
अग्नी ५ नंतर लाँग रेंज बॉम्बची यशस्वी चाचणी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • अग्नी ५ नंतर लाँग रेंज बॉम्बची यशस्वी चाचणी
  • डीआरडीओने विकसित केलेल्या लाँग रेंज बॉम्बची भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी
  • भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने दमदार पावले टाकण्यास सुरुवात केली

DRDO, IAF successfully flight tests indigenous Long Range Bomb । नवी दिल्ली: अग्नी ५ या पाच हजार किमी. पल्ला असलेल्या आंतरखंडीय अण्वस्त्रवाहक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर भारताने लाँग रेंज बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. डीआरडीओने विकसित केलेल्या लाँग रेंज बॉम्बची भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. 

लढाऊ विमानातून गायडेड पद्धतीने एक टन वजनाचा बॉम्ब टाकण्यात आला. विमानातून टाकल्यानंतर १०० किमी अंतरावर निश्चित केलेल्या लक्ष्यावर पडून स्फोट करण्यात लाँग रेंज बॉम्ब यशस्वी झाला. ही चाचणी शुक्रवार २९ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता ओडिशाजवळ समुद्रात करण्यात आली. 

याआधी १९९९च्या कारगिलच्या लढाईपासून ते बालाकोट ऑपरेशन पर्यंत भारताने आवश्यकतेनुसार इस्रायलचे गायडेड बॉम्ब वापरले होते. आता भारताने स्वदेशी गायडेड लाँग रेंज बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली. याआधी गुरुवार २८ ऑक्टोबर २०२१ रोजी भारताने १२५ किलो वजनाच्या स्मार्ट अँटी एअरफिल्ड वेपनची आणि बुधवार २७ ऑक्टोबर २०२१ रोजी अग्नी ५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. स्मार्ट अँटी एअरफिल्ड वेपनच्या मदतीने धावपट्टी नष्ट करणे शक्य आहे. भारताने स्मार्ट अँटी एअरफिल्ड वेपनची आधी जानेवारी २०२१ मध्ये चाचणी घेतली होती. 

स्वदेशी आधुनिक शस्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेऊन भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने दमदार पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ताज्या चाचण्यांमुळे भारताच्या संरक्षण सामर्थ्यात वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी