Drone Attack: येमेनच्या हुथी बंडखोरांचा UAE वर हल्ला, 3 तेल टँकरचा स्फोट, अबू धाबी विमानतळाला आग

Houthi Rebels Attack On UAE : संयुक्त अरब अमीरातवर (UAE) येमेन हौथी बंडखोरांनी (Houthi Rebels) हल्ला (Attack) केला आहे. एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेने अबूधाबी पोलिसांच्या (Abu Dhabi Police) हवाल्याने ही माहिती दिली आहे.

Drone Attack: yemen houthi rebels attack UAE,
येमेनच्या हुथी बंडखोरांचा UAE वर हल्ला,   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 2 जानेवारी रोजी त्याने रवाबी नावाचे यूएई मालवाहू जहाजही ताब्यात घेतले होते.
  • राजधानी अबुधाबीमध्ये दोन ठिकाणी आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली
  • येत्या काही तासांत यूएईमध्ये मोठी लष्करी कारवाई करण्याचा हौथींचा प्लान

Drone Attack On UAE : अबुधाबी : संयुक्त अरब अमीरातवर (UAE) येमेन हौथी बंडखोरांनी (Houthi Rebels) हल्ला (Attack) केला आहे. एएफपी (AFP) या वृत्तसंस्थेने अबूधाबी पोलिसांच्या (Abu Dhabi Police) हवाल्याने ही माहिती दिली आहे. स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे की, मुसाफा भागात तीनही तेल टँकरचा (oil tanker) स्फोट झाला. यानंतर अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Abu Dhabi International Airport) नवीन बांधकामाच्या ठिकाणी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यामुळे विमानतळाचे फारसे नुकसान झालेले नाही. 

UAE मधील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) च्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये विमानतळावर हा स्फोट झाला. स्फोट होण्यापूर्वी आकाशात ड्रोनसारखी आकृती दिसली होती असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. विमानतळावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आणि अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.  दरम्यान येमेनमधील इराण समर्थित हौथी बंडखोरांनी (Yemens Houthi Rebels) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बंडखोरांनी स्वतः हल्ल्याची कबुली दिली आहे. राजधानी अबुधाबीमध्ये दोन ठिकाणी आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यातील एक आग मुसाफा येथे लागली, तर दुसरी आगीची घटना विमानतळावर घडली होती. ड्रोन हल्ल्यामुळे हा प्रकार घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

ही घटना सोमवारी सकाळी घडली. हौथी संघटननेवर नियंत्रण ठेवणाऱ्या फोर्सचे प्रवक्ते याह्या सारी यांच्याशी संबंधित एका ट्विटर अकाउंटवर पोस्ट अनुसार, हौथींचा ‘येत्या काही तासांत यूएईमध्ये मोठी लष्करी कारवाई करण्याची योजना आहे. सौदी अरेबिया पाठोपाठ हौथी बंडखोरांनी यूएईवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या घटनांचा तपास सुरू करण्यात आला आहे.  स्थानिक मीडिया वेबसाइटनुसार, दोन्ही ठिकाणांवरील आग आटोक्यात आणण्यात आली आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीवर कोणता परिणाम झालेला नाही. तसेच कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही.

आगीचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. याआधीही हौथींनी सौदी अरेबियावर अनेकदा असे हल्ले केले आहेत. मात्र आता त्याने यूएईला लक्ष्य केले आहे. सौदी अरेबियातील तेल सुविधा आणि अनेक शहरांवर हौथींनी क्षेपणास्त्रे डागली आहेत. येमेन युद्धात सौदी अरेबियाने सहभाग घेतल्याने ते नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. 

UAE ला का लक्ष्य करत आहे??

येमेनच्या मोठ्या भागावर हौथी बंडखोरांचा कब्जा केला आहे. येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त सरकारच्या नेतृत्त्वाखाली लष्करी संघटना हौथींच्या विरोधात लढा देत आहे. येमेनचं गृहयुद्ध लढण्यासाठी यूएई 2015 मध्ये सौदी युतीमध्ये सामील झाले. त्यामुळे हौथी आता यूएईला लक्ष्य करत आहेत. 2 जानेवारी रोजी त्याने रवाबी नावाचे यूएई मालवाहू जहाजही ताब्यात घेतले होते. जहाजावरील 11 लोकांना बंदिस्त करण्यात आले होते. यातील 7  जण भारतीय होते. संयुक्त राष्ट्र आणि भारताने हौथींना या सर्व लोकांना सोडण्याचे आवाहन केले आहे. हे जहाज आंतरराष्ट्रीय पाण्यात असल्याचे सौदीचे म्हणणे आहे. हौथी संघटनेचे म्हणणे आहे की ते त्यांच्या हद्दीत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी