देश लॉकडाऊन असला तरी 'या' गोष्टी मिळणार, सामान आणण्यासाठी लगेच घराबाहेर पडू नका 

देश लॉकडाऊन असला तरीही जीवनाश्यक गोष्टी सुरु राहणार आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही.

during the lockdown food groceries medical and the most urgent stores will continue 
देश लॉकडाऊन असला तरी 'या' गोष्टी मिळणार, सामान आणण्यासाठी लगेच घराबाहेर पडू नका (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

 • देशात २१ दिवस लॉकडाऊन, पण अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
 • जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि मेडिकल सुरु राहतील
 • पंतप्रधान मोदींकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे. पण यावेळी नेमक्या कोणत्या गोष्टी सुरु असणार हे समजू न शकल्याने देशातील जनतेमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे अनेकांनी किराणा मालाच्या दुकानात गर्दी केल्याचं चित्र दिसत आहे. पण काळजी करु नका नेमक्या कोणत्या गोष्टी सुरु असणार आहे याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहे. ही माहिती केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिकृत नोटीफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. 

पाहा काय-काय सुरु राहणार

 1. अत्यावश्यक सेवा पुरविणारी शासकीय कार्यालये 
 2. किमान मनुष्यबळासह बॅंका/ एटीएम, भारतीय रिझर्व्ह बँक स्टॉक एक्सचेंज,अन्य संबंधित सेवा, विमा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, कॅश ट्रान्झॅक्शन कंपनी
 3. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया
 4. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह आयटी आणि आयटी सेवा.
 5. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक
 6. शेतमाल आणि अन्य वस्तूंची दुकाने
 7. बंदरे, साठवणूक, कस्टम हाऊस एक्सचेंजची कार्यालये, रेल्वेच्या अत्यावश्यक सेवा
 8. खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे अत्यावश्यक वस्तू
 9. खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण
 10. बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा
 11. उपाहारगृहांमधून घरपोच सेवा
 12. औषधी निर्मिती, डाळ व भात गिरणी, इतर जीवनावश्यक अन्नपदार्थ निर्मिती
 13. रूग्णालये, औषधालये, औषधांचे कारखाने
 14. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज 
 15. टँकर्सदवारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा
 16. अत्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी कार्यालये

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...