E-69 Highway : हा रस्ता जिथे संपतो तिथे होतो जगाचा अंत, एकट्याने जाण्याची कुणालाच नसते परवानगी

हे जग कुठे संपतं, या प्रश्नाचं उत्तर देणारा एक रस्ता नॉर्वेमध्ये आहे. हा रस्ता थेट उत्तर ध्रुवाकडे जातो.

E-69 Highway
हा रस्ता जिथे संपतो तिथे होतो जगाचा अंत  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • या रोडनंतर संपतं जग
  • एकट्याला जाण्यास आहे मनाई
  • सहा महिने रात्र आणि सहा महिने दिवस

E-69 Highway | पृथ्वी गोल आहे, हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र अनेकदा मनात प्रश्न येतो की या जगाचा कुठे ना कुठे शेवट होतच असेल ना? जर आपल्याला कुणी हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काही आपल्याला देता येत नाही. मात्र या प्रश्नाचं उत्तर नाहीच, असं मात्र नाही. जगाचा शेवट कुठे होतो, याचं उत्तर एका रस्त्यापाशी जाऊन थांबतं. या जगात असा एक रस्ता आहे जो जगातील सर्वात शेवटचा रस्ता मानला जातो. हा रस्ता संपल्यावर जग संपतं असं मानलं जातं. या रस्त्याचं नाव आहे ई-69 हायवे. या रस्त्यावर फिऱण्याची तुमची इच्छा असेल, तर त्याबाबत अगोदर माहिती करून घेणं गरजेचं आहे. 

उत्तर ध्रुवावर आहे ठिकाण

उत्तर ध्रुव हा पृथ्वीवरचा सर्वात महत्त्वाचा बिंदू आहे. उत्तर ध्रुवाला केंद्रस्थानी ठेऊनच पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. हा ई-69 हायवे नॉर्वेपासून सुरू होतो आणि थेट उत्तर ध्रुवाकडे जातो. हा रस्ता अशा ठिकाणी जाऊन संपतो जिथून पुढे तुम्हाला काहीच दिसत नाही. या रस्त्याच्या शेवटी जाऊन पाहिलं तर चारही बाजूंना केवळ समुद्र आणि बर्फच दिसत राहतो. जगातील ही एक अद्बूत जागा असून तिथं जाण्याचा विचार तुम्ही करत असाल, तर काही पथ्यं तुम्हाला पाळावीच लागतील. 

अधिक वाचा - Sidhu Moose Wala murder case: सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर शूटर्सने बनवलेला VIDEO आला समोर

एकटे जाण्यास मनाई

ई-69 हायवेवर जाण्यासाठी काही नियमांचं पालन करावंच लागेल. यापैकी सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे तिथं तुम्ही एकटे जाऊ शकत नाही. तुम्हाला काहीजणांचा ग्रुप तयार करावा लागेल आणि त्यानंतर या रस्त्यावर जाण्याची परवानगी घ्यावी लागेल. या रस्त्यावर कुठल्याही व्यक्तीला एकट्याने जाण्याची परवानगी नाही. त्याचप्रमाणे या रस्त्यावर ड्राईव्ह करायचीही परवानगी नाही. हा नियम तयार करण्यामागे कारणही तसंच आहे. या भागात सगळीकडे बर्फाची चादर पसरलेली असते आणि जोरदार वारेही वाहत असतात. त्यामुळे एकटी व्यक्ती तिथे गेली तर ती हरवण्याचा, रस्ता चुकण्याचा किंवा भरकटण्याचा धोका असतो. 

सहा महिन्यांची रात्र

या भागात दिवस आणि रात्रीचं गणित अगदी वेगळं असतं. उत्तर ध्रुवाच्या जवळ ही जागा असल्यामुळे थंडीच्या काळात इथे सहा महिने रात्र असते आणि उन्हाळ्यात सहा महिने दिवस असतो. म्हणजेच इथं थंडीत कधीच सूर्य उगवत नाही आणि उन्हाळ्यात कधीच तो मावळत नाही. इतक्या बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीतही लोक इथं राहतात, हे विशेष. थंडीत इथलं तापमान उणे 43 अंश असतं तर उन्हाळ्यात इथलं तापमान 0 अंश सेल्सिअस असतं. 

अधिक वाचा - Jharkhand: 75 टक्के मुस्लीम असल्यानं बंद झाली शाळेतील प्रार्थना; हात जोडण्यासही मनाई

पर्यटनक्षेत्राचा विकास

साधारण शंभर वर्षांपूर्वी इथले लोक केवळ मासेमारी करायचे. मात्र आता हे ठिकाण एक पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला येत आहे. इथला सूर्यास्त पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात. या भागात आता मोठमोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब्स उभे राहिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी