POK भारताचा भाग, एक दिवस निश्चितपणे तिरंगा फडकणारः परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Sep 18, 2019 | 10:06 IST

परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरवर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, पीओके भारताचा भाग आहे आणि मला आशा आहे की एक दिवस या प्रदेशावर देशाचा अधिकार असेल.

EAM S. Jaishankar
POK भारताचा भाग, एक दिवस निश्चितपणे तिरंगा फडकणारः परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  •  परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरवर मोठं वक्तव्य केलं आहे.
  • मी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (यूएजीए) आपल्या पाकिस्तानी समकक्ष शाह महमूद कुरेशी यांची भेट घेणार आहे.
  • पीओके भारताचा भाग आहे आणि मी आशा करतो की, एक दिवस देशाचा त्यावर अधिकार असेल- परराष्ट्रमंत्री

नवी दिल्लीः  परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरवर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की,  मी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (यूएजीए) आपल्या पाकिस्तानी समकक्ष शाह महमूद कुरेशी यांची भेट घेणार आहे. पुढे ते म्हणाले की, पीओके भारताचा भाग आहे आणि मी आशा करतो की, एक दिवस देशाचा त्यावर अधिकार असेल. परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पाकिस्तानबरोबरचा मुद्दा हा कलम 370 चा नाही तर दहशतवादाचा आहे. 

पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचे शंभर दिवस नुकतेच पूर्ण झाले. तसंच यासोबतच परराष्ट्र मंत्रालयानं देखील 100 दिवस पूर्ण केलेत. यावेळी जयशंकर यांनी म्हटलं की, देशांतर्गत आणि परराष्ट्र धोरणामध्ये बरेच घनिष्ठ संबंध आहे. आपली राष्ट्रीय धोरणं आणि परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टे यांच्यातील परस्पर संबंध आणखी दृढ झाले आहेत. 

कुरेशी यांच्यासोबत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे असा प्रश्न पत्रकारांनी जयशंकर यांना विचारला. यावर जयशंकर यांनी म्हटलं की, संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाच्या निमित्ताने मी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेईन. तेव्हाच तेव्हा बघू. 
पुढे जयशंकर म्हणतात की, पाकव्याप्त काश्मीरबाबत आमची भूमिका नेहमीच स्पष्ट आहे. पीओके हा भारताचा एक भाग आहे आणि आम्हाला आशा आहे की एक दिवस यावर भौगोलिक प्रभुत्व असेल.

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचारावर परराष्ट्रमंत्री म्हणाले की, 'पाकिस्तानच्या सिंधमध्ये आज काय घडत आहे, असे नाही की गेल्या 100 दिवसातली ही एकमेव घटना घडली आहे. शीख मुलींचे अपहरण केल्याची प्रकरणे आपल्यासमोर आली आहेत. माझा विश्वास आहे की जर आज मानवाधिकारांचे तपासणी केली तर वास्तविकता सर्वांसमोर येईल. माझा विश्वास आहे की गेल्या 70 वर्षांत पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची संख्या मोठ्या प्रमाणात घसरली आहे. ही संख्या अशी बनली आहे की पाकिस्तान स्वत: जाहीरपणे त्याविषयी निवेदन जाहीर करणार नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कार्यक्रमातील सहभागाविषयी परराष्ट्रमंत्री म्हणाले, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी समुदायाचे आमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठी सन्मानाची गोष्ट आहे. परराष्ट्रमंत्री म्हणाले, "मला विश्वास आहे की G20, ब्रिक्स या बहुपक्षीय मंचांवरील मोठ्या वादविवादांकडे तुम्ही पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की भारताचा आवाज, त्याचे विचार आज अधिक लक्ष देऊन ऐकले जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी