Earthquake in Delhi: भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली हादरली

Earthquake tremors felt in Delhi: दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 

earthquake felt in delhi and adjoining areas check live updates in marathi
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिल्लीत पुन्हा भूकंपाचे धक्के
  • दिल्ली आणि आसपासच्या परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के

Earthquake in Delhi: राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. (earthquake felt in delhi and adjoining areas)

देशाची राजधानी दिल्लीत मंगळवारी (24 जानेवारी 2023) दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 2 वाजून 28 मिनिटांच्या आसपास हे भूकंप जाणवले आहेत. दिल्लीसोबतच दिल्ली एनसीआर, उत्तरप्रदेश आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथेही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

हे पण वाचा : गोरे होण्यासाठी काय खावे? सौंदर्य वाढविण्यासाठी कामी येतील ही फळे

जवळपास दोन मिनिटांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (National Center for Seismology) ने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता आणि भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. जमीनपासून 10 किमी खोलीवर हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

दोन दिवसांपूर्वी उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के

उत्तराखंडमध्ये 22 जानेवारी 2023 मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. तर त्यापूर्वी 13 जानेवारी 2023 रोजी उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे रात्री 2.12 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते.

हे पण वाचा : महिलांनी या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत, अन्यथा...

5 जानेवारीला भूकंपाचे धक्के

यापूर्वी 5 जानेवारी रोजी सुद्धा दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. जम्मू-काश्मीरमध्ये सुद्धा हे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये होता.

हे पण वाचा : झोपण्यासाठी अशी खरेदी करा मऊ गादी, आयुष्याची होईल चांदी

59 टक्के भागाला भूकंपाचा धोका

ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (Bureau of Indian Standards ) म्हणजेच भारतीय मानक ब्यूरोने देशाचं वर्गीकरण पाच भूकंप जोनमध्ये केलं आहे. त्यानुसार, भारताच्या 59 टक्के भागाला भूकंप रिस्क झोनमध्ये ठेवण्यात आले आहे. पाचव्या जोनला सर्वाधिक खतरनाक आणि सक्रिय म्हटले जाते. यामध्ये जम्मू आणि काश्मीरचा भाग (काश्मीर खोरे), हिमाचल प्रदेशचा पश्चिमेकडील भाग, उत्तराखंडमधील पूर्वेकडील भाग, गुजरातमधील कच्छ, उत्तर बिहारचा भाग, भारतातील पूर्वेकडील सर्व राज्ये, अंदमान आणि निकोबार बेट यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी