New Zealand earthquake: तुर्की आणि सीरियानंतर आता न्यूझीलंडमध्ये मोठा भूकंप झाला आहे. भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. असे म्हटले जात आहे की, भूकंपाचे धक्के वेलिंग्टन येथील दोन बेटांवर जाणवले आहेत. भूकंपाची सुरुवात एका मोठ्या धक्क्याने झाली आणि त्यानंतर कमीत कमी 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे हलके झटके जाणवले. (Earthquake of 6.1 magnitude hits in New Zealand)
USGS च्या मते, न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार 15 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 12 वाजून 08 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमीनीखाली 74.3 किलोमीटर खोलीवर होता.
An earthquake of magnitude 6.1 on the Richter scale occurs 78km northwest of Lower Hutt in New Zealand: EMSC pic.twitter.com/R9Tk18vEFu — ANI (@ANI) February 15, 2023
गेल्या काही दिवसांत तुर्की आणि सीरिया येथे मोठे भूकंप झाले. या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे दोन्ही देशांत जवळपास 40 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तुर्कीत एक मोठा भूकंप आला आणि त्यानंतर पाच जोरदार झटके जाणवले होते. या भूकंपामुळे तुर्कीत मोठी हानी झाली आणि एकच हाहाकार उडाला होता. या भूकंपानंतर भारताकडून मदतीसाठी हात पुढे करण्यात आला आणि शक्य ती सर्व मदत करण्यात आली.
हे पण वाचा : रात्री न जेवल्याने वजन कमी होते का?
तुर्कीमध्ये भूकंपाचा पहिला झटका 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 4.17 वाजता आला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजण्यात आली होती. भूकंपाचा केंद्रबिंदू हा दक्षिण तुर्कीतील गाजियांटेप येथे होता. या भूकंपाच्या धक्क्यातून नागरिक सावरणार त्यापूर्वीच भूकंपाचा आणखी एक धक्का जाणवला. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 इतकी नोंदवण्यात आली.
हे पण वाचा : तुम्ही सुद्धा पोटावर झोपता? होऊ शकतात हे नुकसान
त्यानंतर 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप आला. या भूकंपाच्या धक्क्यांनी मालाटया, सनलीउर्फा, ओस्मानिए आणि दियारबाकिर याच्यासह 11 प्रांतांत मोठे नुकसान झाले. संध्याकाळी 4 वाजता भूकंपाचा चौथा धक्का जाणवला. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता भूकंपाचा पाचवा धक्का जाणवला.