Earthquake:देशात भूकंपाचे धक्के, दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Nov 09, 2022 | 14:06 IST

Nepal Earthquake: नेपाळमध्ये डोटी येथे घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये बुधवारी सकाळी 6.27 वाजता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती.

Earthquake
दिल्ली-एनसीआरमध्येही भूकंप; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • मंगळवारी रात्री उशिरा 1.57 वाजता भारत, ( India) चीन (China and Nepal) आणि नेपाळमध्ये भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले.
  • भारतातील दिल्ली, यूपी, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
  • नेपाळमध्ये डोटी येथे घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला.

नेपाळ: Nepal Earthquake: मंगळवारी रात्री उशिरा 1.57 वाजता भारत, ( India)  चीन (China and Nepal) आणि नेपाळमध्ये भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 पर्यंत मोजली गेली. भारतातील दिल्ली, यूपी, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. (Delhi, UP, Bihar, Uttarakhand, Delhi, Madhya Pradesh, Himachal Pradesh) भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. नेपाळमध्ये डोटी येथे घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये बुधवारी सकाळी 6.27 वाजता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती.

भारतातील नेपाळ सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागढजवळ 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. यासोबतच संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये पिथौरागढपासून 90 किमी अंतरावर होता.

अधिक वाचा- Bank Strike Update: पुढील आठवड्यात देशभरात बँक संप, एटीएमसह इतर सेवांवर परिणाम होण्याची शक्यता

भारतात कुठे कुठे भूकंपाचे धक्के जाणवले?

भारतातील दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. लखनऊमध्येही भूकंपाच्या धक्क्यांनी लोकांची झोप उडवली. USGS नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील दिपायलपासून 21 किमी अंतरावर होता. मंगळवारी रात्री उशिराही येथे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यांची तीव्रता 4.9 आणि 3.5 होती.  दरम्यान रविवारी संध्याकाळीही उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपामुळे नेपाळमध्ये सर्वाधिक नुकसान

नेपाळमधील भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. डोटी येथे भूकंपाच्या धक्क्याने एक घर कोसळले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. तर 5 जण जखमी झाले. डोटी येथे 6.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश आहे. भूकंपात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भारतात कोणतेही नुकसान

गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला भूकंपग्रस्त राज्यांकडून माहिती मिळाली आहे. आतापर्यंत दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त नाही. गृह मंत्रालय सतत राज्यांच्या संपर्कात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी