Independence Day 2022 : ज्या कंपनीने भारताला गुलाम बनवलं, आता त्या कंपनीचा मालकच आहे भारतीय!

ज्या कंपनीने भारतावर शेकडो वर्षे राज्य केलं, ती कंपनी आता भारतीय वंशाच्या उद्योजकानं विकत घेतली आहे.

Independence Day 2022
भारतावर गुलामी लादणाऱ्या कंपनीचा आता भारतीय मालक  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • ईस्ट इंडिया कंपनीवर आता भारतीयाची मालकी
  • भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
  • अभिमान वाटावा अशी भारतीयांची कामगिरी

Independence Day 2022 : आज भारत आपला स्वातंत्र्यदिन साजरा (Indian Independence Day 2022) करत असून संपूर्ण देशात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण आहे. भारताने गेल्या 75 वर्षांत अनेक क्षेत्रांत क्रांती केली असून यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत केली आहेत. गेल्या वर्षभरापासून भारतात स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. भारतीय स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांच्या तावडीतून आपला देश स्वतंत्र केला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. मात्र भारत गुलामीत ढकलला जाण्याची सुरुवात झाली होती ईस्ट इंडिया कंपनीच्या (East India Company) आगमनापासून. आज हीच ईस्ट इंडिया कंपनी भारतीय उद्योजकाने विकत घेतली असून त्याचा मालक भारतीय (Indian Owner) बनला आहे. भारताने कुठपर्यंत प्रगती केली, याचं एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिलं जात आहे. 

ईस्ट इंडिया कंपनीने लादली गुलामी

भारतात ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर हळूहळू कशी ‘कंपनी राज’ला सुरुवात झाली, याचा इतिहास सर्वांनाच माहित असेल. ज्यांनी शालेय इतिहास वाचला असेल, त्यांना तर ईस्ट इंडिया कंपनी हे नाव माहित असेल, याच शंका नाही. व्यापाराचं निमित्त करून भारतात घुसलेल्या या कंपनीनं कशा प्रकारे हळूहळू आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली आणि संपूर्ण देशावर आपली हुकूमत प्रस्थापित केली, याचा इतिहास फार जुना नाही. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजेच साधारण 1600 सालाच्या आसपास ही कंपनी भारतात आली. त्यानंतर शेकडो वर्ष या कंपनीने भारतावर राज्य केलं. 1857 च्या उठावापर्यंत या कंपनीचं भारतात राज्य होतं. 

अधिक वाचा - Breaking News 15 August 2022 Latest Update : जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान - मोदी

आता आहे ई-कॉमर्स कंपनी

एका दृष्टीनं विचार केला तर ईस्ट इंडिया कंपनी ही पहिली भारतीय कंपनी म्हणता येईल. मात्र त्याची मालकी काही भारतीयांकडे नव्हती. आता याची मालकी भारतीयांकडे आली असून भारतीय वंशाचे उद्योजक संजीव मेहता यांनी ही कंपनी विकत घेतली आहे. आता ही कंपनी ई-कॉमर्स कंपनी बनली आहे. चहा, कॉफी, चॉकलेट यासारखी उत्पादनं घरपोच देण्याचं काम ही कंपनी करते. 

अधिक वाचा - Independence Day 2022 Speech, Flag Hoisting: लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी करणार ध्वजारोहण, किती वाजता होणार भाषण, कुठे आणि कसे बघाल Live?

कंपनीकडे होतं स्वतःचं सैन्य

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 या दिवशी झाली होती. ब्रिटीश साम्राज्यवादाला खतपाणी घालणे आणि अधिकाधिक प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी प्रयत्न करणे, हेच कंपनीचे मूळ उद्देश होते. ब्रिटीशांच्या राजवटीत सूर्य कधीच मावळत नसे, असं म्हटलं जायचं. जगातील विविध भागांवर ब्रिटीशांनी ताबा मिळवला होता आणि त्यामुळेच ब्रिटीशांची राजवट असलेल्या कुठल्या ना कुठल्या भागात दिवस असायचा. त्यामुळेच ही म्हण प्रचलित झाली होती. कंपनी ही मुळात व्यापारासाठी तयार करण्यात आली होती. मात्र युद्ध करण्याचे विशेषाधिकारही या कंपनीला देण्यात आले होते. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीकडे शक्तीशाली आणि सशस्त्र सैन्यही होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी