ECI on vaccination : पाच राज्यातील निवडणूका वेळेतच होणार, निवडणुक आयोगाकडून लसीकरणाचा वेग वाढवण्याची सूचना

ECI on vaccination संपूर्ण देशात कोरोनाने डोकं वर काढले असून ओमिक्रॉनचेही संकट वाढत आहे. त्यात या वर्षी पाच राज्यात निवडणूका होऊ घातल्या आहेत. सर्वपक्षांनी या निवडणूका पुढे ढकलल्या जाऊ नये अशी मागणी केली आहे. या पाच राज्यातील कोरोना लसीकरणावरून निवडणुक आयोगाची चिंता वाढली आहे.

थोडं पण कामाचं
  • या वर्षी गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यात निवडणूका आहेत.
  • निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यात दौरा करत आहेत.
  • सर्वपक्षांनी या निवडणूका पुढे ढकलल्या जाऊ नये अशी मागणी केली आहे.

ECI on vaccination : नवी दिल्ली :  संपूर्ण देशात कोरोनाने (corona virus)  डोकं वर काढले असून ओमिक्रॉनचेही (omicron) संकट वाढत आहे. त्यात या वर्षी पाच राज्यात निवडणूका (five state election) होऊ घातल्या आहेत. सर्वपक्षांनी या निवडणूका पुढे ढकलल्या जाऊ नये अशी मागणी केली आहे. या पाच राज्यातील कोरोना लसीकरणावरून निवडणुक आयोगाची (election comission of india) चिंता वाढली आहे. पाचही राज्याच्या निवडणुक प्रमुखांनी प्रशासनाला पत्र लिहून लसीकरणाचा (vaccination) वेग वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मणिपूर (manipur) राज्यातील कोरोना लसीकरणाच्या वेगावर चिंता व्यक्त केली आहे. (eci instruction for fast vaccination five state election )


या वर्षी गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यात निवडणूका आहेत. या निवडणुकीच्या तयारीसाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी राज्यात दौरा करत आहेत. काही दिवसांपूर्वी अलाहबाद उच्च न्यायालयाने निवडणुक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनाचे संकट पाहता उत्तर प्रदेशच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. परंतु सर्व राजकीय पक्षांनी निवडणुका पुढे ढकलू नये अशी मागणी केली होती. गेल्या काही दिवसांत निवडणूक आयोगाने राजकीय नेत्यांसोबत बैठक घेऊन कोरोनाचे नियम पालन करून वेळत निवडणूक घेण्यात यावी यावर चर्चा झाली. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची एक टीम लखनौच्या तीन दिवसीय दौर्‍यावर होती. यावेळी अधिकार्‍यांनी अनेक राजकीय नेते आणि इतर संबंधित व्यक्तींशी चर्चा केली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ १४ मे २०२२ रोजी संपणार आहे. 


काही राजकीय नेत्यांनी राजकीय पक्षांच्या सभेला होणारी गर्दी आणि कोरोना नियमांचे होणारे उल्लंघन यावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच सभांना होणारी गर्दी नियंत्रित करावी अशी मागणीही काही पक्षांनी केली आहे. निवडणूक आयोगाने राजकीय नेत्यांचे आणि संबंधित व्यक्तींच्या सूचना ऐकल्या असून मतदान प्रक्रिया अधिक सुलभ आणि सहज करण्यासाठी प्रयत्नशील आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी