अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत आहे, भारत गुंतवणूकदारांसाठी आवडीचं स्थान- पंतप्रधान मोदी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 29, 2020 | 13:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की भारत हा स्वतःच्या बळावर एक जागतिक उत्पादन केंद्र बनेल. तसेच त्यांनी असेही म्हटले आहे की इतरांच्या झालेल्या नुकसानातून फायदा मिळवण्यावर त्यांचा विश्वास नाही.

PM-Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विकास
  • प्रोत्साहन पॅकेज आणि सुधारणा
  • महत्वाचे जागतिक उत्पादन केंद्र

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या (Corona virus) जागतिक संकटामुळे (global pandemic) भारताच्या अर्थव्यवस्थेत (Indian economy) आलेल्या अडचणींमुळे (problematic condition) भारत हा ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचा (deteriorating economy) सामना करत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याबाबत आशावादी (optimistic) आहेत. भारताची अर्थव्यवस्था भविष्यात पूर्वपदावर (back on track) येईल असे त्यांना वाटत आहे. त्यांनी म्हटले आहे की कृषी (agriculture), थेट परकीय गुंतवणूक (Foreign Direct Investment), ऑटो सेल्स (auto sales), उत्पादनात सातत्याने वाढ (steady growth in manufacturing) आणि ईपीएफओ सबस्क्राईबर्सच्या (EPFO subscribers) संख्येत वाढ या पाचही संकेतांच्या बाबतीत भारताची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने पूर्वपदावर (growth faster than expected) येत आहे.

गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांचा विकास

इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा यांचा मोठा विकास हा अर्थव्यवस्था परत उभी करण्याचा आणि भविष्यातील वृद्धीचा पाया असायला हवा.’

प्रोत्साहन पॅकेज आणि सुधारणा

पंतप्रधान पुढे म्हणाले की, अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी जे उपाय करावे लागतील ते केंद्र सरकारकडून योग्य वेळी केले जात आहेत आणि यामुळे अर्थव्यवस्था स्थिर राहणार आहे. त्यांच्या सरकारने कोळसा, कृषी, कामगार क्षेत्र, लष्करी आणि नागरी हवाई वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये केलेल्या सुधारणांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की योग्य वेळी उचलण्यात आलेल्या या पावलांमुळे अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटापूर्वी होती तशी पुन्हा होण्यास मदत होईल. त्यांनी कृषी आणि कामगार क्षेत्रातील सुधारणांचा उल्लेख केला आणि म्हटले, ‘भारतात औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांपेक्षा जास्त संख्या कामगार कायद्यांची आहे असे पूर्वी कुचेष्टेने म्हटले जायचे. हे कायदे अनेकदा कामगार वगळता इतर सर्वांची मदत करतात.’ त्यांनी आत्मनिर्भर योजनेचाही उल्लेख केला आणि म्हटले की ही घोषणा ही भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी, खासकरून छोटे उद्योग आणि अनौपचारिक क्षेत्रासाठी सहाय्यकारी ठरेल.

महत्वाचे जागतिक उत्पादन केंद्र

बीजिंगचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले की, भारत हा स्वतःच्या बळावर एक जागतिक उत्पादन केंद्र होईल. ते पुढे म्हणाले की इतरांच्या झालेल्या नुकसानातून फायदा मिळवण्यावर त्यांचा विश्वास नाही. भारताची लोकशाही राज्यव्यवस्था, लोकसंख्या आणि मागणी या तीन गोष्टी हे ध्येय पूर्ण करण्यात भारताची मदत करतील असा दावाही त्यांनी केला. दुसऱ्या महायुद्धानंतर एक नवी जागतिक व्यवस्था अस्तित्वात आल्याचे सांगत त्यांनी कोरोनानंतरच्या जगातही असेच होण्याची शक्यता असल्याचे नमूद केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी